सांगली महापालिकाही घेणार ‘फेसरीडिंग’ने हजेरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

सांगली - महापालिका प्रशासनाने कामचुकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय शोधला आहे. यापुढे कर्मचाऱ्यांच्या हजेरीची नोंद फेसरीडिंगद्वारे केली जाणार आहे. चेहऱ्याची ‘ओळख’ पटल्याशिवाय कर्मचाऱ्याची हजेरीची नोंद केली होणार नाही. कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तपणाला त्यामुळे आळा बसणार आहे.

कर्मचारी कुठे, कधी कामावर असतात हा गहन प्रश्‍न असतो. कामचुकारपणा, गैरहजेरीबद्दल अनेक वेळा  चर्चाही झाल्या. त्यावर ठोस उपाय सापडत नव्हता.  स्वच्छ भारत अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांची हजेरी थम्बइम्प्रेशनद्धारे घ्यावी, असे नमूद केले आहे. महापालिका कर्मचाऱ्यांची हजेरी नव्या तंत्राद्वारे संगणकीय प्रणालीनुसार घेण्यात येणार आहे. यात कर्मचाऱ्यांचा चेहऱ्यावरून फेस रीडिंगद्वारे नोद होईल. त्यामुळे कर्मचाऱ्याला वेळेवरच हजर रहावे लागेल. त्याची नोंदही संगणकावर होईल. त्यात कोणत्याही प्रकारे फेरफार करता येणार नाही. कर्मचाऱ्यांची दोन वेळा हजेरी नोंद केली जाणार असल्याने कचरा उठावचे नियोजन करून तिन्ही शहरे स्वच्छ ठेवण्यास चांगली मदत होणार आहे. 

मुकादमांना कर्मचाऱ्यांच्या हजेरीत बदल करता येणार  नाही, अशी व्यवस्था आहे. मुकादमाला हाताशी धरून हजेरी नोंदवण्याचे प्रकारही यापुढे बंद होतील. 

स्वच्छ सर्वेक्षणासंदर्भात आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी घेतलेल्या बैठकीत सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते यांनी ही माहिती सर्व स्वच्छता निरीक्षक, मुकादमांना दिली. कर्मचाऱ्यांच्या हजेरीबाबत वारंवार तक्रारी उपस्थिती होत होत्या. योग्य ती खबरदारी म्हणून ही नवी उपाययोजना करण्यात आली आहे.

Web Title: Face reading muster by Sangli corporation

टॅग्स