सांगली महापालिकेकडून "फेसबुक अपडेट' 

सांगली महापालिकेकडून "फेसबुक अपडेट' 

सांगली - सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने टीकेची धनी बनत असलेली सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका काहीच काम करत नाही का? तसे असते तर शहर थांबले असते... पण, केलेल्या कामांकडे लक्ष दिले जात नाही. ते द्यावे आणि मनपाचे काम लोकांपर्यंत पोहचावे, यासाठी फेसबुकचे स्वतंत्र पेज तयार करण्यात आले असून त्याव्दारे महापालिका रोजच्या कामाचे फेसबूक अपडेट सांगलीकरांपर्यंत पोहचवत आहे. 

चांद्रयान 2 आकाशात उडाले, देश खूप पुढे गेलाय, महापालिकेला मात्र तंत्राचा वापर करायला थोडा उशीरच झाला. असो, उशीरा का असेना, महापालिकेने स्वतःच्या चांगल्या कामांचा ढोल पिटण्याचा निर्णय घेतला आहे. नवे आयुक्त नितीन कापडणीस टेक्‍नोसॅव्ही आहेत. त्यामुळे त्यांनीच पुढाकार घेऊन महापालिकेचे फेसबुक खाते सुरु केले आहे. त्याव्दारे शहरात विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांना "मैत्री विनंती' पाठवण्यात आली आहे.

अर्थात महापालिकेशी मैत्री कुणाला नकोय, त्यामुळे यादी आता मोठी होत निघाली आहे. शहरातील विविध संघटना, अन्य शासकीय कार्यालये आदींच्या फेसबुक खात्याशीही महापालिका जोडली गेली आहे. महापालिकेचा जनसंपर्क विभाग या साऱ्याचे नियंत्रण करतोय. दररोज पाच-पन्नास फोटो अपलोड केले जात आहेत. विविध विभागातील लोक रोजच्या कामाचे फोटो काढून जनसंपर्क विभागाला देतात आणि त्याची छाननी करून ते फेसबुकला अपलोड केले जातात. 

या फेसबुक खात्याचा सांगलीकरांनीही उपयोग होणार आहे. आपल्या समस्यांचे फोटो काढून "हवेत' फिरवण्यापेक्षा थेट मनपाच्या खात्याला "टॅग' केल्यास समस्या लवकर पोहचेल, अशी अपेक्षा आहे. काहींनी तो प्रयोगही केला आहे. आज मनपाने औषध फवारणी, मिरजेतील स्वच्छतेचे फोटो अपलोड करून त्याची माहिती दिली आहे. त्यामुळे महापालिका कामही करते, हे ठासून सांगण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com