यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस चिकित्सा करून घेण्याची सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस चिकित्सा करून घेण्याची सुविधा

सरकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस चिकित्सा करून घेण्याची सुविधा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : राज्यातील सरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना यापुढे कोणतीही चिकित्सा कॅशलेसद्वारे करून घेता येणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ राज्यातील 25 लाख नागरिकांना होणार असून बिले परत मिळण्यास होणारा विलंब दूर होणार आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयाचे सरकारी कर्मचाऱ्यांनामधून स्वागत केले जात आहे. 

राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची चिकित्सा करून घेण्यासाठी रुग्णालयाचे बिल अगोदर भरावे लागत होते. तसेच चिकित्सा झाल्यानंतर आलेल्या खर्चाची बिले जमा केल्यानंतर कर्मचाऱ्यांना ही रक्कम परत मिळत होती. मात्र बिले जमा केल्यानंतर सहा ते सात महिने कर्मचाऱ्यांना बिलांसाठी वाट पाहावी लागत होती.

हेही वाचा: तळ्यात बुडणाऱ्या लहान मुलांना जीवदान देणाऱ्याचे बालदिनानिमित्त कौतुक

तसेच बिलाची रक्कम परत देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून चिरमिरी मागितली जात होती. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना बिले परत मिळविताना मोठी अडचण निर्माण होत होती. मात्र यापुढे कोणत्याही आजारावर चिकिस्ता करून घेण्यासाठी रक्कम भरावी लागणार नाही. त्यामुळे पैसे नाहीत म्हणून चिकित्सेसाठी होणारा विलंब टळणार आहे. तसेच कॅशलेस मुळे वेळीच उपचार करून घेण्यास मदत होणार असून बिले परत मिळाली. यासाठी कर्मचाऱ्यांची होणारी हेळसांड कमी होणार असून बिले देताना होणारा भ्रष्टाचार कमी कमी होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे सरकारच्या नव्या योजनेचा हजारो लोकांना लाभ मिळणार असून येत्या काही दिवसात याबाबत सर्व रुग्णालयांना माहिती देण्यात येणार आहे.

'चिकित्सा करून घेतल्यानंतर बिले द्यावी लागत होती. त्यानंतर बिले परत मिळण्यास 6 ते 7 महिने लागत होते. मात्र कॅशलेस चिकित्सा उपलब्ध झाली तर अनेकांना याचा चांगला लाभ होईल. तसेच बिले देताना होणारा भ्रष्टाचार कमी होण्यास मदत मिळणार आहे.'

- आर .आर. कुडतुरकर, मुख्याध्यापक

loading image
go to top