कऱ्हाड अर्बन बँकेत भरण्यात आल्या 49 हजारांच्या बनावट नोटा

सचिन शिंदे
शनिवार, 12 मे 2018

नोटाबंदी लागू झाली त्या काळात म्हणजे आठ नोव्हेंबर २०१६ च्या दरम्यान अनोळख्या व्यक्तीने नोटा भरल्या आहेत. असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यात एक हजारच्या २७ तर पाचशेच्या ४४ नोटांचा त्यात समावेश आहे.

कऱ्हाड : येथील कऱ्हाड अर्बन बँकेच्या भरण्यात 49 हजारांच्या बनावट नोटा आल्या आहेत. त्याची बँकेचे उप महाव्यवस्थापक आशिष ठाकूर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

नोटाबंदी लागू झाली त्या काळात म्हणजे आठ नोव्हेंबर २०१६ च्या दरम्यान अनोळख्या व्यक्तीने नोटा भरल्या आहेत. असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यात एक हजारच्या २७ तर पाचशेच्या ४४ नोटांचा त्यात समावेश आहे. बँकेच्या ४८ शाखा आहेत. त्यापैकी कोणत्यातरी शाखेत याचा भरणा झाला आहे. असेही फिर्यादीत म्हटले आहे.

बनावट नोटा चलनात आल्याचा धक्कादायक प्रकार तब्बल दीड वर्षानंतर उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: fake notes in Karhad Urban Bank

टॅग्स