कुटुंबातील सदस्यांनी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने लुटली दिवाळी सुट्टीची मजा

गजेंद्र पोळ
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

चिखलठाण : शेटफळ (ता. करमाळा) येथील दोन वर्षांच्या लहानग्यापासून ते शंभर वर्षांच्या पंजोबापर्यंत सात चुलत भावांच्या कुटूंबातील 48 सदस्यांनी एकत्र येऊन दिवसभर विविध प्रकारच्या स्पर्धा खेळ व मनोरंजन करत आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिवाळीची सुट्टी घालवली.

चिखलठाण : शेटफळ (ता. करमाळा) येथील दोन वर्षांच्या लहानग्यापासून ते शंभर वर्षांच्या पंजोबापर्यंत सात चुलत भावांच्या कुटूंबातील 48 सदस्यांनी एकत्र येऊन दिवसभर विविध प्रकारच्या स्पर्धा खेळ व मनोरंजन करत आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिवाळीची सुट्टी घालवली.

सध्या नात्यांमधिल आपूलकी संपत चालली आहे, मने दुभंगली जात आहेत, एका घरात राहाणारी मंडळी एकमेकांशी वर्षोनवर्ष बोलत नाहीत. सख्खे भाऊ एकमेकांचे तोंडही पहात नाहीत. अशी उदाहरणे आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. विज्ञानाच्या युगात नवनवीन साधने आली सण उत्सवाचे स्वरुप बदलले. परंतु, एखाद्या निर्मळ मनाच्या व्यक्तीने ठरवले तर दुरावलेली मणं सण उत्सवाच्या निमित्ताने कशी जोडली जातात याचे उदाहरण शेटफळ येथे  नवनाथ नाईकनवरे यांच्या प्रयत्नातून पहाण्यास मिळाले.

राज्य राखीव दलात साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून काम करत असलेले नवनाथ दिपावलीसाठी सुट्टिवर दोन दिवस गावाकडे आले. पाडव्याच्या दिवशी त्यांच्या भावासह वयाची शंभरी पार केलेले त्यांचे थोरले चुलते, चार चुलत भाऊ त्यांच्या घरातील सर्वजण आशा अठ्ठेचाळीस सदस्यांना घरगुती कार्यक्रम आहे असा निरोप देऊन आपल्या शेतात एकत्र बोलावले आणि दिवसभर सर्वानी एकत्र करत अगदी स्पिकर साऊंड सिस्टीम लावुन विविध प्रकारच्या स्पर्धा खेळ, मनोरंजन करुन प्रत्येकाला सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले.

सुरवातीला वडिलधाऱ्या समोर लहान मुलं महिला यांना संकोचल्यसारख वाटलं. परंतु नंतर सर्वजन खेळीमेळीच्या वातावरणात आपलं वय विसरून सहभागी झाले. आपल्या कला सादर केल्या आणी एकच धमाल केली. सासू-सूना दिर-भाऊजया यांचे एकमेकांचे मोठेपण रूसवे फुगवे कधी गळुन पडले ते कळलेच नाही आणि आगळीवेगळी दिवाळी साजरी करत पुन्हा पुढच्या वर्षी आसेच एकत्र येण्याच्या निश्चय करत एकमेकांनाचा निरोप घेतला.

Web Title: Family members enjoyed diwali holidays