
पारनेर : मावळ (जि. पुणे) तालुक्यात शेतकऱ्याने तब्बल नऊ वर्षे वेठबिगार म्हणून डांबून ठेवलेल्या पळशी (ता. पारनेर) येथील कुटुंबाची नुकतीच सुटका करण्यात आली. या कुटुंबाला आधार कार्ड, रेशन कार्ड मिळवून देऊन, संजय गांधी निराधार योजनेत समाविष्ट करण्याचे आश्वासन तहसीलदार ज्योती देवरे यांनी आज दिले, तसेच त्यांच्या नावे घरकुलाचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याचा आदेश पळशीच्या सरपंचांना दिला.
हे पाहा राहुरीत पुन्हा दिवाळी साजरी
याबाबत माहिती अशी ः दुष्काळी स्थितीमुळे पळशी (ता. पारनेर) येथील संदीप काळे, सुरेश काळे व सावळेराम काळे 2011मध्ये धामणी (ता. मावळ, जि. पुणे) येथे हनुमंत मारुती गराडे यांच्याकडे मजुरीसाठी गेले होते. तेथे गेल्यावर गराडे याने त्यांना कामाला जुंपले ते कायमचेच. गेल्या नऊ वर्षांत त्यांना एकदाही सुटी दिली नाही. नातेवाइकाचे लग्न असो, की अत्यंविधी, त्यांना गावाकडे येऊच दिले नाही. सकाळी सातपासून रात्रीपर्यंत त्यांच्याकडून काम करून घेतले जाई. केवळ पाचशे रुपये जोडी याप्रमाणे पगार दिला जाई.
येथे क्लिक करा गडाख यांच्या शपथविधीनंतर जल्लोष
गेल्या तीन वर्षांत तर जोडीला केवळ अडीचशे रुपये रोज दिला जात होता. "आम्ही आजारी पडलो, तरीही कधीच सुटी मिळाली नाही. आमच्याकडून कामात चूक झाली, तर मालक आम्हाला मारझोडही करत असे. तो अतिशय रागीट स्वभावाचा व गुंड प्रवृत्तीचा होता. आमची तेथून सुटका होऊन सुमारे पाच महिने झाले, तरीही आम्हाला त्याच्या धमक्या येत आहेत. आम्हाला भीती वाटत आहे,' असे संदीप काळे यांनी सांगितले.
हेही वाचा मोबाईलने घेतला तरुणाचा जीव
नऊ वर्षांत भाजीपाला माहीतच नाही : काळे
संदीप काळे यांनी "सकाळ'ला सांगितले, की मालक आम्हाला खाण्यासाठी स्वस्त धान्य दुकानातील धान्य, डाळी व तेल-मिरची आणि साखर देत असे. नऊ वर्षांत आम्हाला भाजीपाला माहीतच नाही. या सर्व नरकयातनांतून सुटका झाली. मालक वेळेत पगार तर देत नव्हताच; शिवाय घेतलेल्या उचलीच्या रकमेवर 10 टक्के व्याज घेत होता. एकदा त्याच्या छपराला आग लागून एक जुनी दुचाकी आणि ट्रॅक्टर जळाला. त्याची भरपाईदेखील आमच्याकडून घेतली. आमच्या पगारातून पाच लाख रुपये कपात करून घेतले.
हे वाचा महाराष्ट्रात उधळली लाली
धमक्यांबाबत गुन्हा नोंदविण्याची सूचना : देवरे
तहसीलदार ज्योती देवरे यांनी "सकाळ'ला सांगितले, की मावळ तालुक्यातील संबंधित शेतकऱ्याने काळे कुटुंबासह जिल्ह्यातील बावीस जणांना वेठबिगार म्हणून डांबून ठेवले होते. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. वेठबिगारीतून सुटका झालेल्या काळे कुटुंबीयांना आर्थिक मदतीसह रेशन कार्ड, आधार कार्ड आणि घरकुल देण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे. त्यासाठी आम्ही आज काळे कुटुंबाची भेट घेतली. त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचे आम्ही ठरविले आहे. त्यांना सध्या येत असलेल्या धमक्यांबाबत पारनेर पोलिसांना कल्पना देऊन, संबंधितांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.