अधिकाऱ्यांसह पोलिसांकडून बळीराजाचं 'एप्रिल फूल'; मग...

बुडा कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच चूल तयार करून त्यावर जेवण तयार करण्यात आले.
बुडा कार्यालयासमोर चूल मांडून भोजनाची तयारी करताना कणबर्गीचे शेतकरी.
बुडा कार्यालयासमोर चूल मांडून भोजनाची तयारी करताना कणबर्गीचे शेतकरी.sakal

कणबर्गी : गुढी पाडवा झाल्यानंतर बैठक घेण्याचे आश्‍वासन १ एप्रिल रोजी बुडाचे अधिकारी व माळमारूती पोलिसांनी दिले होते. पण अधिकारी व पोलिसांनी एप्रिल फूल केल्यामुळे नाराज झालेल्या कणबर्गी येथील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.११) बुडा कार्यालयासमोर पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारीही (ता.१२) हे आंदोलन शेतकऱ्यांनी सुरूच ठेवले. कणबर्गी निवासी योजनेच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करून स्थगिती मिळविलेल्या शेतकऱ्यांना बुडाकडून त्रास दिला जात आहे. तो त्रास कमी होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

बुडा कार्यालयासमोर चूल मांडून भोजनाची तयारी करताना कणबर्गीचे शेतकरी.
बुडा कार्यालयासमोर चूल मांडून भोजनाची तयारी करताना कणबर्गीचे शेतकरी.sakal

बुडा कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच हे आंदोलन सुरू करण्यात आले. त्याच ठिकाणी चूल तयार करून त्यावर जेवण तयार करण्यात आले. मंगळवारी आंदोलक शेतकऱ्यांची संख्या वाढली, त्यामुळे मोठी भांडी आणून मोठ्या प्रमाणात भोजनाची व्यवस्था करण्यात आली. बुडा प्रशासनाकडून जोवर समस्यांची गांभिर्याने दखल घेतली जाणार नाही, तोवर आंदोलन सुरूच राहिली अशी माहिती शेतकरी बबन मालाई यानी दिली. ३१ मार्च रोजी बुडाची बैठक झाली. त्या बैठकीवेळी कणबर्गीचे शेतकरी बुडा कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यानी बुडाचे अभियंता व अधिकारी याना घेराव घातला. निवासी योजनेसाठी जमिन घेण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात जावून मशागतीचे काम करीत आहेत. त्याला बुडाचे अधिकारी आडकाठी आणण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले काम योग्य पद्धतीने करता येत नाही अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.

त्याबाबत बुडाकडून ठोस आश्‍वासन मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या समस्येबाबत चर्चा करण्यासाठी १ एप्रिल रोजी बैठक घेतली जाईल अशी ग्वाही देण्यात आली होती, त्यामुळे शेतकरी बैठकीसाठी तेथे गेले. शेतकऱ्यांनी अध्यक्ष व आयुक्तांची भेट घेतली, पण त्यानी बैठक घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुडा कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. तेथेच चूल मांडून भोजनाची तयारी सुरू केली. याची माहिती मिळल्यावर माळमारूती पोलिसांनी शेतकऱ्यांची भेट घेतली.

२ एप्रिल रोजी गुढी पाडवा आहे. सण झाल्यावर बुडाकडून बैठकीचे आयोजन केले जाईल अशी ग्वाही देण्यात आली. त्यासाठी आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली. बुडा अधिकाऱ्यांनीही आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. पण आठवडाभराचा कालावधी लोटला तरी बैठकीचे आयोजन केले गेले नाही, त्यामुळे सोमवारी शेतकऱ्यांनी बुडा कार्यालयासमोर पुन्हा आंदोलन सुरू केले. मंगळवारीही आंदोलन सुरूच ठेवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com