

Khanderajuri Fraud Case: Farmer Approaches Police Over Unpaid Raisin Deal
sakal
मिरज: खंडेराजुरी (ता. मिरज) येथे शेतकऱ्याकडून घेतलेल्या बेदाण्याचे पैसे न देता त्याची सहा लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सुनील सुकुमार माणगावकर (डोंगरवाडी, खंडेराजुरी) यांनी फरहान हमीद शेख (कसबे सुकेणे, ता. निफाड, जि. नाशिक) याच्याविरोधात मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. २१ मार्च २०२५ ला रात्री बाराच्या सुमारास हा प्रकार घडला.