Sangli News : पत्नी, वडील यांच्यासमवेत शेतात पेरणी करण्यास गेले होते. दुपारी बियाणे संपल्याने ते आणण्यासाठी घरी आले, त्यावेळी बियाणे घेऊन जात असताना जाता-जाता जनावरांना वैरण टाकण्यासाठी ते गोठ्यात गेले. यावेळी ते कडबाकुट्टी यंत्राच्या विजेचा धक्का बसून जमिनीवर पडले.
Emotional atmosphere in Jambhalewadi as villagers gather where the farmer was electrocuted.sakal
शिराळा : जांभळेवाडी (ता. शिराळा) येथील शंकर भीमराव मांगलेकर (वय ४२) या शेतकऱ्याचा कडबाकुट्टी यंत्राच्या विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. याबाबत सागर संजय मांगलेकर यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली. ही घटना आज (ता. १५) दुपारी तीनच्या सुमारास घडली.