शेतकऱ्यांसह कुटुंबीयांना विमा कवच - रघुनाथराजे नाईक-निंबाळकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

फलटण - सध्या शेती उत्पादित मालाला दर मिळत नाही. परिणामी बळिराजाची होणारी फरफट व असुरक्षितता लक्षात घेऊन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्‍यातील ९६ हजार १०० शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना महाराजा मोलोजीराव अपघात विमा योजनेचे कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारची शेतकऱ्यांसह त्याच्या कुटुंबातील घटकांना अपघात विमा योजनेचे फायदे देणारी योजना राबविणारी फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील पहिलीच असेल, असा विश्वास या समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केला.

फलटण बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून समितीच्या आवारात किंवा शहरात भाजीपाला, धान्य विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ १२ रुपयांत पोटभर जेवण दिले जाते. आगामी काळात शहरात सर्व सुविधांनीयुक्त असे कॅन्सर उपचारासाठी अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून रघुनाथराजे म्हणाले, ‘‘बाजार समित्यांसह विविध बॅंका, संस्था या केवळ शेतकऱ्यांसाठी अपघात विमा योजना राबवताना दिसतात. पण, बळिराजासह त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना महाराजा मालोजीराव अपघात विमा योजना सुरू करण्याचा निर्णय विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या विचारातून घेतला आहे. शेतीच्या कामातून होणाऱ्या अपघाताबरोबर कुत्रा, साप चावणे, झाडावरून खाली पडणे, वाहन अपघात, विजेचा शॉक व नैसर्गिक आपत्ती यातून होणारे मृत्यू या बाबींचा अंतर्भाव अपघात विमा योजनेत करण्यात आला आहे. उपलब्ध सांखिकी आकडेवारीनुसार ९६ हजार १०० शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील घटक असे मिळून सुमारे चार लाख व्यक्तींना योजनेचा लाभ मिळेल.’’ उपसभापती भगवान होळकर व सचिव शंकरराव सोनवलकर यांनी योजनेचे स्वरूप स्पष्ट केले.

सध्या शेतकरी व त्यांचे कुटुंबीय यांचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संबंधितांनी बाजार समितीच्या ०२१६६-२२२२१६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 
- रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण

Web Title: Farmer with Family Insurance Security Raghunathraje Naik Nimbalkar