सावकाराकडून फसवणूक झाल्याने पिंप्रीशहलीच्या शेतकऱ्याची आत्महत्या

सावकाराकडून फसवणूक झाल्याने पिंप्रीशहलीच्या शेतकऱ्याची आत्महत्या

नेवासे :  व्याजाने दिलेली रक्कम व्याजासह परत फेड करूनही जमीन नावावर करून देण्यास नकार दिल्याने नेवासे तालुक्यातील पिंपरी शहाली येथील भालकर कुटुंबाची फसवणूक केल्याने शेतकरी अशोक भालकर याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी श्रीमती सुनीता अशोक भालकर यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, पिंपरी शहाली शिवारात गट नंबर ९१ मध्ये साडे तीन एकर शेती जमीन आहे. माझे दिर गोरक्ष श्यामराव भालकर यांचे नावावर याच शेत ९१ मध्ये साडे तीन एकर शेत जमीन आहे. पती अशोक याना शेतीच्या कामासाठी तसेच लोकांचे उसने घेतलेले पैसे देण्यासाठी शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील सावकार कारभारी श्रीपती आढाव याने आमची शेत जमीन गट नंबर ९१ मधील ४० आर जमीन कायम खरेदी खताने २२ मार्च २०१७ रोजी दिली होती. त्याच बरोबर गट नंबर ९१ मधील पती अशोक याची २० आर व दिर गोरक्ष यांची ६० आर अशी एकूण ८० आर जमीन ही कारभारी आढाव याने स्वतःचे पत्नी कडूबाई कारभारी आढाव याने प्रत्येकी ५ लाख ५ हजार असे पैसे दिले होते.

घेतलेले पैसे तीन टक्के व्याजासह परत दिल्यावर शेत जमीन पुन्हा नावावर करून देतो असे सांगितले. खरेदी केलेल्या शेत जमिनिपैकी माझे पती अशोक यांचे नावावरील ४० आर ही जमीन तलाठ्यामार्फत सातबाराच्या उताऱ्यावर स्वतःच्या नावावर केलेली आहे. कडूबाई यांच्या नावावरील खरेदी केलेली ८० आर जमीन ही त्याने स्वतः च्या पत्नीच्या नावावर करून घेतलेली आहे. 

 सदरची शेतजमीन ही खरेदी केल्यावर सावकार आढाव यांनी आमच्या घरी दर महिन्याला येऊन व्याजाचे पैसे घेऊन जात असे असे साधारण वर्षभर चालल्यानंतर सावकार आढाव याने व्याजाची रक्कम ५ टक्के दराने द्यावी अशी मागणी करू लागला. त्यानंतर माझे पती यांच्याकडे असलेले ५ लाख ५ हजार रुपये माझे भाऊ सुहास गंगाधर घोडेचोर, शरद गंगाधर घोडेचोर यांच्याकडून घेऊन सावकार कारभारी आढाव यास परत केले. तरीही व्याजाचे पैसे जास्त होतात ते दिल्याशिवाय आमची खरेदी केलेली जमिन नावावर करून देणार नाही असे म्हणून टाळाटाळ करू लागला. यामुळे माझे पती अशोक यांना मानसिक त्रास होत होता. सावकाराने फसवल्यामुळे मला आता जीवन संपवल्याशिवाय पर्याय राहिला नाही असे ते सारखे घरी म्हणत होते. दिनांक ६ सप्टेंबर रोजी माझे पती अशोक सायंकाळी ५ वाजता बाहेरून घरी आले यावेळी ते खूप तणावात दिसत होते. त्यांना विचारले असता सावकार कारभारी आढाव हा व्याजाच्या पैशासाठी खूप त्रास देत असल्याचे त्यांनी सांगितले व ते घरातून बाहेर गेले. रात्री साडे आठच्या सुमारास दीर गोरक्ष भालकर हे घरी आले व त्यांनी सांगितले अशोक हे तुरीच्या शेतात बेशुद्ध पडलेले आहे असे सांगितल्यावर आम्ही तेथे जाऊन त्यांना घरी आणले. त्यावेळी त्यांच्या नाकातून फेस येत होता. अशोक यांना ग्रामीण रुग्णालय नेवासे फाटा येथे घेऊन गेलो असता उपचारापूर्वीच ते मयत असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.  

अशोक यांनी काहीतरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली असून सावकार आढाव यांच्या जाचाला कंटाळून अशोक यांनी औषध प्राशन करून आत्महत्या केली. दिलेल्या फिर्यादीवरून सावकार कारभारी श्रीपती आढाव व त्यांची पत्नी कडूबाई कारभारी आढाव दोघे राहणार शेवगाव यांच्याविरुद्ध नेवासे पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गौतम वाबळे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com