अबब... एका एकरात १३० टन ऊस

Farmer of Karandwadi of Sangali made record sugarcane  production
Farmer of Karandwadi of Sangali made record sugarcane production

नवेखेड : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील शेतीनिष्ठ शेतकरी सुरेश कबाडे यांनी दोन एकर दहा गुंठे क्षेत्रात 358.432 मेट्रिक टन उत्पादन घेतले आहे. श्री. कबाडे यांनी ऊसासंदर्भात वेगवेगळे प्रयोग केले असून, आता एकरी सुमारे 130 टन इतक विक्रमी उत्पादन घेतले आहे.

यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, 26 जून 2018 रोजी साडेसात फूट सरीमध्ये दीड फुटावर एक या पद्धतीने "को 86032' या वाणाची लागवड केली. रोपे सेट करण्यासाठी फुलविक, अमिनो, सिव्हिडी; त्यानंतर 30, 60 व 90 दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या तीन फवारण्या केल्या. त्यांचा ऊस ठिबक सिंचन वरती आहे. मोठ्या बांधणीपर्यंत एक लिटर, तर मोठ्या बांधणीनंतर सरीच्या दोन्ही बाजूला लॅटरल पद्धतीने पाईप टाकून घेतल्या. उसाची सरासरी उंची बावीस-तेवीस फूट होती. वाडे सोडून 52 ते 54 कांड्या होता गेल्या.

20 जानेवारी रोजी राजारामबापू कारखान्यात गळीतास गेला, त्यावेळी तो 358.432 मेट्रिक टन; म्हणजे एकरी सुमारे 130 उत्पन्न मिळाले. या विक्रमी ऊस उत्पादनासाठी कबाडे यांनी जाड व लांब तेरे असणारे व दहा महिने वयाचे बियाणे वापरले. गवताळ वाढ काढून टाकली. रासानिक लागवडीचा प्रत्येक डोस देताना माती आड जमिनीत भरपूर ओल असताना फवारणी व आळवणी यांची नियोजन केले. 

सुनियोजित खतमात्रा 
सुरेश कबाडे यांनी आपल्या ऊसाला खतांची मात्रा सुनियोजित पद्धतीने दिली. रोपे सेट झाल्यानंतर 20 दिवसांनी पहिला डोस एकरी दिला. तसेच एकरी 4 किलो खोडकिडीसाठी क्‍लारॉइन्ट्रोल टाकले. लावण केल्यापासून 15दिवसानी ते 45 दिवसापर्यंत आठवड्यातून एकदा असे 4 वेळा खते ड्रीप मधून एकरी सोडली. याशिवाय 91-180 दिवसापर्यंत प्रत्येक आठवड्यातून एकदा असे 12 वेळा खते ड्रीपमधून एकरी सोडली. रोप लावणी नंतर 105 दिवसानी मोठी बांधणी केली. त्यावेळी योग्य खतांची मात्रा दिली. तसेच एकरी 4किलो खीांडकिडीसाठी क्‍लारॉइन्ट्रो टाकले. नंतर 180-300 दिवसापर्यंत प्रत्येक आठवड्याला एकदा असे 18 वेळा खालील खते ड्रीप मधून एकरीं सोडली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com