Electric Shock:'कुराडे मळ्यात विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू'; घरासमोरील विहिरीवर गेले अन्..
Tragedy in Kolhapur: कुराडे मळ्यातील घन:श्याम कुराडे शनिवारी (ता. १६) सायंकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरखर्चाचे व जनावरांसाठी पाणी भरण्यासाठी वीज पंप सुरू करण्यासाठी घरासमोरील विहिरीवर गेले होते. त्याच वेळी त्यांना मोटरीचा धक्का लागून ते कोसळले.
Farmer from Kurade Mala, Kolhapur, dies after electric shock near home well."Sakal
अंकलखोप : शेतातील विहिरीवरील वीज पंपाचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. घन:श्याम बजरंग कुराडे (वय ४३) असे त्यांचे नाव आहे. याबाबतची वर्दी आष्टा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशीष काळे यांनी आष्टा पोलिसांत दिली.