Farmer Mahade Bolke success In CA Post Kolhapur Marathi News
Farmer Mahade Bolke success In CA Post Kolhapur Marathi News

शेतकरी माऊलीची तपस्या आली फळाला.....

चंदगड (कोल्हापूर) : शालेय जीवनातच वडिलांचे छत्र हरपले. आईने शेतात मोलमजुरी करून दोन मुलांना शिक्षण दिले. गावही दुर्गम, डोंगरात वसलेले. केवळ चौथीपर्यंत शाळा. पुढे शिक्षण घ्यायचे तर खर्च अधिक. परंतु, त्या माऊलीने जिद्दीने मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले आणि सुमारे २५ वर्षांनंतर तिच्या कष्टाचे चीज झाले. मुलग्याने ‘सीए’ची परीक्षा उत्तीर्ण होऊन आईचे पांग फेडले. पुंद्रा (ता. चंदगड) येथील महादेव मारुती बोलके या तरुणाची ही यश कथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.

महादेव यांचे वडिल दौलत कारखान्यात नोकरीला होते. अपघातात त्यांचे निधन झाले आणि कुटुंबावरील छत्र हरपले. आई शारदा यांना मुलाच्या बुद्धिमत्तेची कल्पना होती. शेतात मजुरी करून मुलांना उच्च शिक्षित केले. चंदगड येथील न. भु. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात बारावी वाणिज्य शाखेचे शिक्षण पूर्ण करीत असतानाच महादेवने पुढे सीए होण्याचे निश्‍चित केले. परंतु त्यासाठी शहरात जावे लागणार होते. तेथील राहणे, जेवण आणि शिकवणी वर्गाचे शुल्क हा खर्च पेलवणारा नव्हता. बहीण अलका अमृसकर पुण्यात रहात असल्याने जेवण्याचा व राहण्याचा खर्च वाचला. 

आईच्या प्रेरणेतून मिळाले यश
पहिल्याच प्रयत्नात सीपीटी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतरची परीक्षा उत्तीर्ण व्हायला दोन वर्षे लागली. पुढे तीन वर्षे ‘आर्टिकलशिप’ केल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी पुन्हा दोन वेळा प्रयत्न करावे लागले. पाच वर्षाचा हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांना सात वर्षे लागली.

दृिष्टकोन बदलायला हवा 

जिद्द असेल तर कोणतेही ध्येय साध्य करता येते, यावर माझा पहिल्यापासून विश्‍वास होता. उच्चपदस्थ होण्यासाठी घरची स्थिती श्रीमंतीची हवी. शिकवणी वर्ग लावायला हवेत, हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा न्यूनगंड आहे. हा दृिष्टकोन बदलायला हवा.
- महादेव बोलके, सीए परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com