गरजू शेतकऱ्यांना दूध काढण्याचे यंत्र देऊ - संजीवराजे निंबाळकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

कोरेगाव - ग्रामीण भागातील वाढते पशुधन लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मागणीप्रमाणे गरजू शेतकऱ्यांना दूध काढण्याचे यंत्र उपलब्ध करून दिले जाईल. कोरेगावच्या सभापतींच्या मागणीनुसार या तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी भरीव निधी दिला जाईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

येथील पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या खरीप हंगाम नियोजन सभेत ते बोलत होते. 

यावेळी कृषी समितीचे सभापती मनोज पवार, महिला व बालकल्याणच्या सभापती वनिता गोरे, सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय साळुंखे, कृषी विकास अधिकारी डॉ. चांगदेव बागल, तहसीलदार जयश्री आव्हाड, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, मंगेश धुमाळ, गटविकास अधिकारी शरद मगर, सहायक गटविकास अधिकारी अल्मास सय्यद, तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर करावा, असे आवाहन करून श्री. निंबाळकर म्हणाले, ‘‘जलसंधारणाच्या कामांसह शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवून त्यांची आर्थिक उन्नती साधण्याचे काम खऱ्या अर्थाने या तालुक्‍यामध्ये झाले आहे. उल्लेखनीय कामामुळेच तालुका कृषी अधिकारी साळुंखे यांचा तसेच वेळू गावाचा राज्य पातळीवर गौरव झाला. त्यामुळे आपल्या जिल्ह्याचे नाव राज्यात होऊ शकले.’’शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, असे आवाहन  सभापती पवार यांनी केले. 

सभापती जगदाळे म्हणाले, ‘‘जलसंधारणाच्या कामाचे चांगले फलित म्हणून या वर्षी तालुक्‍यामध्ये काही अपवाद वगळता टॅंकरची मागणी झालेली नाही. खते, बियाणे, औषधांचा तुटवडा होऊ नये, यासाठी तालुक्‍यासाठी भरीव निधी मंजूर करावा.’’श्री. पाटील, श्री. धुमाळ, डॉ. बागल यांची भाषणे झाली. तालुका कृषी अधिकारी साळुंखे यांनी खरीप नियोजन आढावा सादर केला. गटविकास अधिकारी मगर यांनी प्रास्ताविक केले. विस्तार अधिकारी अशोक भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. उपसभापती साळुंखे यांनी आभार मानले.

Web Title: farmer mil machine sanjivraje nimbalkar