शेतकरी संपावर ठाम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

पुणतांबे, ता. 22 ः शेतकरी संपाच्या क्रांतीची मशाल पुणतांब्यातून पेटली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घ्यावी; अन्यथा वणवा पेटेल, असा खणखणीत इशारा शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी दिला. शेतकऱ्यांच्या एक जूनपासून सुरू होणाऱ्या संपात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.

शेतकरी संपाची रणनीती ठरविण्यासाठी राज्य कार्यकारिणी सदस्यांची बैठक आज येथे झाली. त्यात पाटील बोलत होते. विधानसभेच्या अधिवेशनात कर्जमुक्तीचा विषयच नाही. यावरून सरकार व विरोधी पक्षांना शेतकऱ्यांविषयी किती कळवळा आहे हे समजते, असे ते म्हणाले. बैठकीला राज्यभरातून प्रतिनिधी आले होते. पुणतांब्यात 25 ते 30 मे या काळात धरणे आंदोलनासाठी राज्यभरातून प्रतिनिधी येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. शहराकडे जाणारे दूध-भाजीपाला एक जूनपासून बंद करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. प्रसंगी वाहने अडविली जातील, असा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

Web Title: farmer strike insistent