नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या 

solapur.jpg
solapur.jpg

सोलापूर : गंगेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या नापिकीला कंटाळून केली असल्याचे कुटूंबाचे म्हणणे आहे. यासंदर्भात पोलिसात अद्याप कोणत्याही प्रकारची नोंद झाली नसल्याचे पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. 

विनोद आप्पाराव रेवळे (वय 31) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रेवळे यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेतला. ही घटना सकाळी सात वाजता उघडकीस आली. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. रेवळे यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे कुटूंबातील सदस्यांनी सांगितल्याची माहिती सरपंच जावेद शेख यांनी दिली. दोन-तीन वर्षापासून शेतीत पिक आले नाही. त्या कारणावरून रेवळे तणावाखाली होती असे सरपंच शेख यांनी सांगितले. 

यासंदर्भात पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद झाली नसल्याचे तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. रेवळे त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com