बळिराजाला पावसाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

राज्यात यंदा समाधानकारक पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. उन्हाळ्यात शेतीच्या मशागतीची सर्व कामे उरकून बळिराजा आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

सोलापूर - राज्यात यंदा समाधानकारक पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. उन्हाळ्यात शेतीच्या मशागतीची सर्व कामे उरकून बळिराजा आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे. या महिन्यात वळवाचा पाऊस झाल्यानंतर आपल्या शेतामध्ये वेगवेगळी पिके घेण्याची धडपड आतापासून शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.

मागील वर्षी खूपच कमी पाऊस पडला होता. त्यामुळे सध्या सगळीकडे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. मे महिन्याचा दुसरा पंधरवडा सुरू झाला आहे. त्यामुळे या कालावधीत वळवाच्या पावसाची शक्‍यता असते. मॉन्सूनपूर्वी वळवाचा पाऊस जर पडला, तर त्याच्या जोरावर शेतामध्ये भाजीपाल्याच्या पिकाची लागवड करायची. पाण्याची बचत व्हावी, तणापासून पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी भाजीपाला पिके घेण्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर केला जातो.

Web Title: Farmer is waiting for the rain