लोणंद -पुणे-सातारा मार्गावर शेतकऱ्यांचे रास्ता रोखो अंदोलन

रमेश धायगुडे
सोमवार, 14 जानेवारी 2019

लोणंद - साखरवाडी येथील न्यू फलटण शुगरवर्कस या साखर कारखान्याने सालपे (फलटण) येथील कै. भगवानराव शिंदे या आत्महात्या केलेल्या शेतकऱ्याचे उसाचे ७० हजार रुपयांचे बिल त्यांच्या नावावर त्वरित जमा करावे. तसेच कारखाण्याचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांचेवर कडक कारवाई करावी. कारखान्याने २०१७ मध्ये गळप केलेल्या सर्व शेतकऱ्यांची उसबीले त्वरीत दयावीत. या मागणीसाठी आज (ता. १४) सालपे (फलटण) येथे पुणे -सातारा मार्गावर पंकज शिंदे (सालपे, फलटण) व बाळासाहेब शेळके (निंबोडी, खंडाळा) यांच्या नेतृवाखाली एकत्र येवून शेतकऱ्यांनी रास्ता रोखो अंदोलन केले. 

यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने फलटण महसूल विभागाचे अधिकारी व लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक गिरिश दिघावकर यांच्याकडे या मागणीचे निवेदन दिले. गावातील भैरवनाथ मंदिरात एकत्र जमून त्यानंतर घोषण देत पुणे -सातारा मार्गा पर्यंत मोर्चाने येवून सालपे एसटी बसस्थानका समोर १० ते १५ मिमिटे रास्ता रोखो केला. यावेळी मोठया संख्येने शेतकरी उपस्थीत होते. 

साखरवाडी साखर कारखाण्याचे अध्यक्ष व संचालक मंडळ लबाड आहे. पाच ते सहा हजार शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.५० ते ५५ कोटी रुपये उसाचे बील या शेतक त्यांना गेल्या दिड वर्षापासून दिले नाही. स्वतःसाठी गाडया, बंगले, हॉटेल व पोल्ट्री उभारण्यासाठी पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहित. मात्र हे आम्हा शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे आहेत ते आम्ही घेतल्याशिवाय आता थांबणार नाही. यासाठी लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत अन्यथा हा संघर्ष थांबणार नाही. यापेक्षाही अधिक तीव्र अंदोलने छेडण्याचा इशाराही यावेळी पंकज शिंदे व बाळासाहेब शेळके यांनी यावेळी बोलताना दिला. लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गिरिश दिघावकर व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
 
Web Title: farmers agitation on pune satara road