मोहोळमध्ये पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकरी आनंदी

राजकुमार शहा
सोमवार, 16 एप्रिल 2018

मोहोळ - घाटने ता मोहोळ येथील सीना नादिवर बांधलेल्या बैरेज बंधाऱ्यात उजनी धरणातून सोडलेले पाणी साडे तिन मिटर उंचीने आडल्याने परिसरातील 13 गावांचा शेतीसह पिण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.

मोहोळ - घाटने ता मोहोळ येथील सीना नादिवर बांधलेल्या बैरेज बंधाऱ्यात उजनी धरणातून सोडलेले पाणी साडे तिन मिटर उंचीने आडल्याने परिसरातील 13 गावांचा शेतीसह पिण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.

मराठवाड्याला पाणी नेण्यासाठी सीना नदीवर घाटने गावा नजिक मोठा बैरेज बंधारा बांधला आहे, या बंधाऱ्याचा 135 एम.सी.एफ.टी. पाणी साठवण क्षमता आहे. या बंधाऱ्यात पाणी आडल्याने घाटने परिसरातील 13 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर मार्गी लागला. तसेच सुमारे 1500 एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. या बंधाऱ्यात पाणी अड़वावे यासाठी मोहोळ तालुका भाजपाचे अध्यक्ष सतीश काळे यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख व जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या माध्यमातुन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपूरवठा केला होता. 2 ते 3 वेळा शेतकरी शिष्ट मंडळानेही भेट घेतली त्यामुळे मंत्री महाजन यांनी कायम स्वरूपी पाणी अडवुन सम्बंधित अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तर हा विषय कालवा सल्लागार समितीच्या नियोजनात समाविष्ट करण्याचेही आदेश दिले होते. त्यानुसार उजनी धरणातून सोडलेले पाणी बंधाऱ्यात अडविण्यात आले. या बंधाऱ्यापासून केवळ 5 किमी अंतरावर मोहोळ शहराला पाण्याची अड़चण आलीतर त्याही बंधाऱ्यात पाणी सोडता येते. त्यामुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे.

या बंधाऱ्यात पाणी आडल्याने आमच्या परिसरातील 13 गावांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. आम्हाला शेतीला पाणी नसल्याने जमीन पडिकच ठेवावी लागत होती. मात्र सतीश काळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे  आम्हा शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.
सौदागर गायकवाड 

या गावांचा सुटला पाणी प्रश्न
घाटने, भोयरे, मलिकपेठ, एकुरके, बीटले, नरखेड, डिकसळ, वाळूज, देगाव, आष्टे, भांबेवाड़ी, हिंगणी.

Web Title: Farmers are happy because of the problem of water in Mohol has solves