भारत पाकिस्तान सीमेपेक्षाही सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांची परिस्थिती मोदी सरकारमुळे वाईट 

विष्णू मोहिते
Wednesday, 3 February 2021

 

 

कृषी कायद्याविरोधात देशभर शेतकरी आंदोलन तापत आहे. पाकिस्तान बॉर्डरवर सुद्धा अशी परिस्थिती नाही. अशी परिस्थिती मोदी सरकारने दिल्लीमध्ये केली आहे

सांगली : कृषी कायद्याविरोधात देशभर शेतकरी आंदोलन तापत आहे. पाकिस्तान बॉर्डरवर सुद्धा अशी परिस्थिती नाही. अशी परिस्थिती मोदी सरकारने दिल्लीमध्ये केली आहे. हिटलरला माघे टाकण्याचे काम मोदी करत आहेत, अशी टीका शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. शेतकरी संघटना आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी ( ता. 6) विविध संघटनांकडून पाठिंबा दिला जातो आहे. आमच्या संघटनेचे  राज्यभरातील स्थानिक कार्यकर्ते रास्ता रोको करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा- गोकुळ सभेत प्रोसिडिंग वाचलेच कसे यावरून विरोधकांनी सत्ताधार्‍यांना धरले धारेवर

ते म्हणाले," शनिवारी देशभर दुपारी 12 ते 3 रास्ता रोको करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान विरोधी असल्यामुळे आंदोलनाची भूमिका घेत आहे. संघटनेने कृषी कायद्याचे समर्थन केले होते. त्यातील त्रूटी दूर करा, अशी आमची मागणी होती. चार दिवसापूर्वी मोदी सरकारने आम्ही केवळ एका फोन कॉलच्या अंतरावर आहोत, अशी घोषणा केली. प्रत्यक्षात शेतकरी आंदोलकांनी दिल्लीत येवू नये यासाठी रस्त्यावर खिळे, अडथळे, मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. पाकिस्तानच्या सीमेवरही एवढा बंदोबस्त नाही. चीनच्या सीमेवर एवढा बंदोबस्त ठेवला असता तर त्यांनी चार किलोमिटर आत येवून गाव वसवले नसते.' अशी टीकाही केली. 

हेही वाचा- गुंगीचे औषध देऊन लातूर प्रवाशांना लुटले

 दिल्लीत आंदोलक शेतकरी मयत झाले. सरकारला लाज वाटायला हवी होती. माणुसकीची भान आज मोदी सरकारला नाही. हिटलरला माघे टाकण्याचे काम मोदी करत आहेत. पाटील म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीतील आंदोलनला पाठिंबा देत आहेत आणि महाराष्ट्र मध्ये ऊस कारखानदार, बाजार समित्यांतील गैरकारभारांला पाठिंबा घालत आहेत. ही गंभीर बाब आहे. महाराष्ट्रातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. ऊसाला दर मिळत नाही. ऊस गाळपानंतर 14 दिवसात बिल देण्याचा नियमही पाळला जात नाही. शेतकऱ्याला लुटायचा नेहमीचा प्रयत्न या महाआघाडी सरकारमध्येही सुरुच आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली. सरकारने वीज बिल माफ करतो असे सांगितले आणि आता सर्व सामान्यकडून वीज बिल वसूल केले जात आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers Association leader Raghunath Patil criticism on pm narendra modi political sangli  news