दुधाने आंघोळ करत आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

मोहोळ : 'या सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, कोण म्हणतय देत नाही घेतल्या शिवाय राहात नाही' यासह अन्य घोषणा देत जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यानी मोहोळ शहरातील शिवाजी चौकात दुधाने अंघोळ करून दुधदर वाढीबाबत अंदोलन केले. 

यावेळी देशमुख म्हणाले, दुध दरवाढीबाबत शेतकऱ्यांच्या विरोधी भुमिकेची राष्ट्रवादी व काँग्रेसची परंपरा भाजपा सरकारने पुढे चालविली आहे. पाणी वीस रुपये व दुध पंधरा रुपये लीटर अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. इकडे दुध दराबाबत अंदोलन सुरू आहे आणी तिकडे मोदी परदेश दौरे करताहेत हा केवढा विरोधाभास आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुधउत्पादक शेतकऱ्याबाबत चे वक्तव्य बालीश पणाचे आहे. चिथावणी देणारे आहे. शासनाने आता अंत पाहु नये लवकर निर्णय न झाल्यास दुग्ध विकास मंत्री जानकरांना सोलापूर जिल्हयात पाय ठेवु देणार नाही. सरकारची भुमिका ताठर असेल तर गावागावात जाऊन जनजागृती करू व मुंबईला जाणारे पुर्ण दुध बंद करू असा इशारा ही देशमुख यांनी दिला. 
 
Web Title: farmers bathing in milk on road