शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका...सावकारांचा आम्ही बंदोबस्त करतो

FARMERS.jpg
FARMERS.jpg

सांगली- जिल्ह्यात सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत. चार दिवसांपूर्वी कदमवाडी येथील शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली, हे दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता त्रास देणाऱ्या सावकाराची माहिती आम्हाला कळवावी आम्ही सावकाराचां बंदोबस्त करू, असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले आहे.

 
खराडे म्हणाले,""जिल्ह्यात पोलिसांच्या आशीर्वादाने सावकारी फोफावली आहे. कदमवाडीतील शेतकरी संजय कदम यांनी सांगलीतील सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांने चिठ्ठीत सावकाराचे नाव लिहिले आहे. तरीही त्याच्यावर कारवाईला चार दिवस उलटले. याचे कारण त्यांच्यामागे पोलिसाचे पाठबळ हेच आहे. सध्या कोरोना संकटामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. द्राक्ष बेदाणा भाजीपाला या सर्वाचे दर गडगडले आहेत. शेती, शेतकरी उद्‌ध्वस्त झालाय. शेतीमालाची विक्री सुरू आहे, मात्र त्याला योग्य दर नाही. शेतीमाल विक्री करून घातलेला खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती आहे.

कवडीमोल किमतीने शेतीमालाची विक्री सुरू आहे, त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या द्राक्ष बागवर कुऱ्हाड चालविली. अनेकांनी ट्रॅक्‍टरने भाजीपाला गाडून टाकला. अनेकांनी फुकट शेतीमाल दिला याचाच फायदा सावकार घेत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी हतबल न होता जाच आणि त्रास देणाऱ्या सावकाराची आम्हाला नावे कळवा. स्वाभिमानी शेतकरी संघटना संबंधित सावकाराच्या बंदोबस्त नव्हे कडेलोट करू, पण शेतकरी भावांनो मामुली सावकारासाठी अनमोल जीवन संपवू नका. जिल्ह्यातील सर्व कर्जबाजारी शेतकऱ्यांना आमचे आवाहन आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com