मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना मिळाले हक्काचे पाणी

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा - पाण्यापासून वंचित असलेल्या उजनी कालव्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या तालुक्यातील बोराळे, तामदर्डी, सिध्दापुर, अरळी, नंदुर या भागातील शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सदस्या शैला गोडसे यांनी प्रयत्न करून हक्काचे पाणी मिळवून दिले.

सकाळने या भागातील पाण्याच्या समस्याबाबत कालवा आहे. गावाला आणि शेतीला पाणी नाही हे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल शैला गोडसे यांनी घेतली. याबाबत संपूर्ण माहिती घेऊन उजनी कालव्याच्या सर्वच अधिकार्‍यांना एका निवेदनाद्वारे या पाण्यासंदर्भात विचारणा केली. यात कालव्याच्या प्रकल्पासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या पण या शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या पाण्यापासून वंचित असल्याचे समजले.

असता येत्या पंधरा दिवसांच्या आत त्या भागातील कालव्यात पाणी सोडण्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले. अधिकार्‍यांनी व शैला गोडसे यांनी या भागातील बोराळे, नंदुर या उजव्या कालव्याच्या प्रकल्पाची पाहणी करून सुरुवातीपासुन ते शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक शेतकर्‍यांला पाणी मिळेल का याची खात्री करून या शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पाणी मिळवुन दिले. 

यावेळी जि.प. सदस्या शैला गोडसे, उपअभियंता सुरेश यादव, शाखाधिकारी कोकरे, गणेश गावकरे, श्रीशैल कुभांर, प्रमोदकुमार म्हमाणे, महादेव भोजने, कुबीर चौगुले, पृथ्वीराज भोजने, अक्षय पवार, मलकु मसलुगी, भारत पाटील, आदिसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कालव्याची कामे अपूर्ण असल्यामुळे या भागातील काही गावांना पाण्याचा पूर्णपणे लाभ होत नाही. या भागाला पूर्णपणे जोपर्यंत लाभ होत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करत राहू. आणि शेवटच्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे पाणी मिळवून देऊ.
शैलाताई गोडसे, शिवसेना नेत्या.

नंदुर बोराळे कालव्याची अपूर्ण कामे आहेत ती लवकरच पूर्ण करून देवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न करू. 
सुरेश यादव, उपअभियंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com