कांदा अनुदान आता मे-जूननंतरच मिळणार

कांदा अनुदान आता मे-जूननंतरच मिळणार

सोलापूर : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये 16 डिसेंबर 2018 ते 31 जानेवारी 2019 या कालावधीत कांदाविक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानासाठी आता 31 मार्चपर्यंत संबंधित बाजार समित्यांमध्ये अर्ज करता येणार आहेत. परंतु, त्यांना अनुदान मात्र आचारसंहितेनंतर मे-जून महिन्यातच मिळेल, असे पणन संचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीतील शेतकऱ्यांच्या अनुदानाचे 114 कोटी रुपये सोमवारी वितरित करण्यात येणार आहेत. त्यानंतर आता पुढील कालावधीतील शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी आता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी अर्ज करूनही सरकारने मुदतवाढ दिल्याने राज्यातील दीड ते दोन लाख शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुष्काळाच्या बैठका, प्रधानमंत्री सन्मान निधीचे काम सुरू असल्याने तलाठ्यांचा सात-बारा व पीकपेरा घेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ही मुदतवाढ दिल्याचे पणन संचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी मुदतीत अर्ज करावेत, जेणेकरून तत्काळ अनुदान मिळेल, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी 114 कोटी रुपये सोमवारी वितरित होतील. परंतु, त्यानंतरच्या शेतकऱ्यांना मदत देताना आचारसंहितेचा अडथळा येऊ शकतो. त्यामुळे त्यांना कधीपर्यंत अनुदान मिळणार, हे निश्‍चित सांगता येणार नाही. 
- दीपक तावरे, पणन संचालक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com