कृषी औषधे शेतकऱ्यांना रोखीने खरेदीचा कृषी सेवा केंद्रातून आग्रह

विष्णू मोहिते 
Thursday, 17 September 2020

जिल्ह्यात द्राक्ष गोडी छाटणी हंगामांच्या तोंडावर कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना रोखीने खरेदीचा आग्रह केला जातो आहे.

सांगली : जिल्ह्यात द्राक्ष गोडी छाटणी हंगामांच्या तोंडावर कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना रोखीने खरेदीचा आग्रह केला जातो आहे. रास्त किंमतीत किटकनाशके, टॉनिक देवू पण शेतकऱ्यांनी सहकार्य करावी, असा संदेश कृषी विक्रेता संघटनेकडूनही दिला जातो आहे. शेतकऱ्यांसाठीही रोखीने खरेदी फायद्याची ठरेल. शिवाय हवी असणारे खते, किटकनाशक मिळतील. काही दुकानांत " रोखीने खरेदी'चे फलक झळकू लागले आहेत. आगामी बाजारपेठ, मालाची खरेदी, मिळणारा दराबाबत संभ्रम असल्याने दुकानदारांनी सावध भूमिका घेतली आहे. 

कोरोनाच्या महामारीच्या काळात शेतीमालाचे दर घसरले. त्यात केव्हा सुधारणा होईल, याचा अंदाज घेणे अवघड होत आहे. त्यात गेल्या वर्षी द्राक्ष हंगामाच्या सांगतेवेळी लॉकडाऊन सुरु झाल्याने बाजारात विक्रीची द्राक्षांचे दर अचानक कोसळले. पेटीला 250 ते 300 रुपयांचे दर केवळ 60 ते 80 रुपयापर्यंत घसरले. एवढे दर घसरुनही दलाल न फिरकल्याने अनेक शेतकऱ्यांवर बेदाणा तयार करावा लागला. सांगली जिल्ह्यात सुमारे 35 हजार टन जादा बेदाणा निर्मिची झाली. विक्रीच्या द्राक्षाचा बेदाणा गुणवत्तापूर्ण नसल्याने दरावरही परिणाम झाला. सध्या 40 ते 90 रुपये दर मिळतो आहे. 

शेतकऱ्यांना कोरोनाचा फटका बसल्याने त्यांनी कृषी दुकानदारांचे देणे थकवले. दुकानदारांनी कंपन्यांची देणी थकवली. या उद्योगक्षेत्रात अडचणींनाचा पाढा सुरु झाला. दुकानदारांना कंपन्या उधारी बंद केली. रोखीने खरेदीवर भर देण्यास सांगितले. मात्र प्रत्यक्ष कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना औषधे, किटकनाशके उधार देणे बंद करण्याऐवजी हंगामाच्या तोंडावर दुकानात मालच कमी ठेवला आहे. 

"रोखीने खरेदीचे फलक लावले आहेत.' त्यासाठी तुम्ही मागितलेल्या कंपन्यांचा गुणवत्तापूर्ण मालाची हमी दिली जात आहे. उधारीवर असताना दुकानदारांने दिलेली औषधे घेतली जात होती. तीही प्रथा बंदची शक्‍यता आहे. 

गेल्या वर्षी हंगामातील शेतकऱ्यांची थकबाकी राहिल्याने कृषी केंद्र अडचणीत आहेत. सर्वच डिलरना रोखीने खरेदीचा प्रस्ताव कंपन्यांकडून येत आहे. परिणामी डिलर्सही शेतकऱ्यांना रोखीने खरेदीसाठी आग्रही आहेत. त्यात शेतकऱ्यांचा फायदा, काटकसरीने फायदा होईल.' 
- अविनाश पाटील, अध्यक्ष- सांगली ऍग्रीकल्चर डिलर इनपुटस्‌ असोसिएशन 

शेतकऱ्यांनी संकटाचे संधीत रुपांतर करावे. रोखीने खरेदीने गुणवत्तापूर्ण आणि ब्रॅडेड कंपन्यांचा औषधे वापरुन चांगले उत्पादन मिळवावे. उधारी घेवून जादा रक्कमेची बचत होईल. शिवाय ब्रॅडेडमुळे खर्च काही प्रमाणात कमी होईल.' 
- सुनिल सावळवाडे, सौरभ कृषी, सांगली. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers to purchase agro-medicines in cash