कऱ्हाड : शेतकऱ्यांनी भुसंपादन करण्यासाठीची मोजणी थांबवली

संतोष चव्हाण 
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

दोन दिवसांपुर्वी तासवडे येथे झालेल्या संपादन बाधित शेतकऱ्यांचे वहागाव येथे 18 ला होणारी महामार्गची मोजणी बंद पाडण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे काल वहागाव येथे महामार्गवरील लोकांनी एकत्र येथे सहापदरीची मोजणी बंद पाडली होती. 

उंब्रज (कऱ्हाड) : राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणासाठी भुसंपादन करण्यात येणाऱ्या वहागाव येथे काल गोटे, मुढें, खोडशी, वहागांव, वनवासमाची, बेलवडे, तासवडे, वराडे आणि शिवडे या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येत सहापदरीची मोजणी बंद पाडली होती. यासंबधीचे वृत्त भुसंपादनच्या उपजिल्हाअधिकारी आणि महामार्गच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांना समजताच यांनी तत्काळ वहागाव याठिकाणी धाव घेत सर्व संपादन बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय मोजणी करणार नाही, याची हमी दिली.  

दोन दिवसांपुर्वी तासवडे येथे झालेल्या संपादन बाधित शेतकऱ्यांचे वहागाव येथे 18 ला होणारी महामार्गची मोजणी बंद पाडण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे काल वहागाव येथे महामार्गवरील लोकांनी एकत्र येथे सहापदरीची मोजणी बंद पाडली होती. 

याबाबत भुसपादंन आणि महामार्गाच्या वरीष्ठ आधिकाऱ्यांना समजताच हे दोन्ही विभाग खडबडून जागे झाले. आणि त्यांनी या लोकांच्या आंदोलनाची दखल घेत बाधित शेतकऱ्यांशी फोन वरून सपर्कं साधत सकाळी आकरा वाजता वहागाव येथे बैठकीस येण्याचे सांगण्यात आले. त्याप्रमाणे वहागाव, बेलवडे, तासवडे, वराडे, शिवडे, वनवासमाची, खोडशी, गोटे आणि मुढें येथील सर्व शेतकरी वहागाव येथे अकरा वाजाता एकत्र आले. परंतु बैठकीची अकराची दिलेली वेळ गेली दुपारचे तीन वाजले तरी भुसपादंन आणि महामार्गचे वरीष्ठ अधिकारी  बैठकीच्या ठिकाणावर आलेच नाहीत. वरिष्ठ 
आधिकाऱ्यांनी दिलेली वेळ निघून गेल्यामुळे शेतकऱ्यांचा संयम संपला आणि तीन वाजता सर्व शेतकरी बैठकीवर बहिष्कार टाकत निघुन गेले. यावेळी सर्वेअर प्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांची खुप विनवणी केली पण त्यानांच शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागले. यावेळी महामार्ग विभागाचे अधिकारी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

दरम्यान चार वाजता भुसंपादन उपजिल्हाधिकारी डॉ. रेखा सोळंकी आणि महामार्गचे बी. ऐ. भाई यांचे वहागाव येथे आले. त्यावेळी फक्त वहागाव आणि तासवडे ग्रामंस्थ उपस्थितीत होते. त्यावेळी वहागाव आणि तासवडे ग्रामस्थांनी गोटे, मुढें, खोडशी, बेलवडे, वराडे, वनवासमाची आणि शिवडे येथील शेतकरी नसल्यामुळे चर्चा करणार नाही आणि उद्याची मोजणी होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे प्रशासना पुढे पेच निर्माण झाला. शेवटी भुसपादंन उपजिल्हाअधिकारी यांनी वरील सपांदन बाधीत शेतकऱ्यांची दोन दिवसात कराड येथे एकत्र बैठक घेण्याचे निश्चित करत चर्चेशिवाय पुढील प्रक्रिया करणार नाही, असे सांगितले. यावेळी शेतकरी, मिळकतधारक यांनी यापूर्वीच त्यांच्या जमिनी, घरे यापूर्वीच गेली असल्याने आता नव्याने भूसंपादन करुन देणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. 

Web Title: Farmers stopped counting for land acquisition in karhad