दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांनी दिला बंदला पाठिंबा

aatpadi
aatpadi

आटपाडी (सांगली) : शेतकऱ्यांनी राज्यभर पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेने तडवळे येथे आटपाडी-भावघाट रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला.                                      

शेत मालासह दुधाचे दर कोसळल्यामुळे राज्यभर विविध शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन राज्यभर शेतकरी संपाची हाक दिली आहे. या संपाचे लोण आटपाडी तालुक्यातही पोहोचले. बळीराजा शेतकरी संघटनेने आज सकाळी भिवघाट- आटपाडी रस्त्यावर तडवळे येथे रस्ता रोको आंदोलन केले. एक तास वाहतूक बंद केली होती. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच रस्त्यावर दूध ओतून निषेध केला. बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, तडवळे  शाखाध्यक्ष अमित गिडे, शिवाजी खिलारी आदींनी सहभाग घेतला होता.         

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com