शेततळ्यावर द्राक्षबागेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

बोरामणी - लोकसंवाद कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील शेतकऱ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधला.
बोरामणी - लोकसंवाद कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील शेतकऱ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधला.

सोलापूर - बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील सिद्राम बिराजदार यांनी सामुदायिक शेततळे योजनेतून शेततळे उभारून २१ एकर द्राक्षबाग फुलवली आहे. शेततळ्याच्या जोरावर दुष्काळातही बाग फुलविणाऱ्या बिराजदार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाद दिली आणि त्यांच्या शेततळ्याचे उद्‌घाटन झाल्याचे सोमवारी व्हीसीद्वारे जाहीर केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज लोकसंवाद कार्यक्रमातून कृषी विभागाच्या लाभ घेतलेल्या राज्यभरातील लाभार्थींशी संवाद साधला. यात बोरामणीच्या सिद्राम बिराजदार, जयशंकर बिराजदार यांचा समावेश आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयातून १८ शेतकरी यात सहभागी झाले. बिराजदार यांनी मुख्यमंत्र्यांना शेतळ्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदत केल्याचे सांगितले. गेल्या वर्षी उभारलेल्या शेततळ्यातून यंदाच्या दुष्काळात आधार मिळाल्याचेही ते म्हणाले. बिराजदार यांनी शेततळ्याचे उद्‌घाटन करण्यासाठी निमंत्रण दिल्यानंतर तुमच्या शेततळ्याचे उद्‌घाटन झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी व्हीसीद्वारे जाहीर केले. बिराजदार यांनी गेल्या वर्षी युरोप खंडातील देशात द्राक्षे निर्यात केली आहेत. त्यांच्या द्राक्षाला ८२ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी वेळ कमी
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी अतिशय मोजक्‍या वेळेत संवाद साधला. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्‍न होते. ते मुख्यमंत्र्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुरू होण्यापूर्वीच त्यांनी दुसऱ्या जिल्ह्याचे नाव घेतल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. शेतकऱ्यांचे प्रश्‍न लिहून मुख्यमंत्र्यांना पाठविण्याची विनंती अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com