फॅशनेबल स्टोल्स वापरा, पण जपून...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

सातारा - उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी महिलांमध्ये वापरला जाणारा स्कार्फ, स्टोल हा केवळ गरज न राहता तो फॅशन सिंबॉल बनला आहे. कापडाचा पोत, प्रकार, डिझाईन, स्टायलिश लुक देणाऱ्या असंख्य व्हरायटीज्‌ महाविद्यालयीन तरुणी, महिलांमध्ये लोकप्रिय आहेत. 

शहरात शंभर रुपयांपासून दीड हजार रुपयांपर्यंतचे स्कार्फ किंवा स्टोल्स उपलब्ध आहेत. मात्र, शुक्रवारच्या घटनेने तो धोकादायक असल्याचेही पुन्हा सिद्ध केले आहे. त्यामुळे त्याचा वापरही जपून होणे अत्यावश्‍यक आहे.

खणआळी रस्त्यावरील विक्रेत्यांपासून ते मॉल्सपर्यंत आणि ऑनलाइन मार्केटमध्येही स्कार्फची चलती आहे. ग्राहकांना खेचण्यासाठी एकावर एक फ्री, मोठ्या संख्येतील खरेदीवर सूट, महागड्या कापडाच्या स्कार्फवर उन्हाळ्यानिमित्त सूट अशा अनेक ऑफर्स आहेत. ऊन, धूळ, प्रदूषणापासून चेहरा, केसांचे संरक्षण करण्यासाठी चेहऱ्याला स्कार्फने वेढणाऱ्या तरुणींची संख्या मोठी आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तीनही ऋतूंमध्ये वर्षभर याची विक्री तेजीत असते. स्कार्फ, स्टोल्स गळ्याभोवती, डोक्‍याभोवती बांधण्याच्या पद्धतींवरून याच्या फॅशन्स तयार झाल्या आहेत. 

...ठरू शकतो जीवघेणा!
दुचाकीवर बसल्यानंतर स्कार्फ, स्टोल्स चुकीच्या पद्धतीने बांधला तर तो जीवघेणा ठरत आहे. हे वारंवार समोर येत आहे. अनेकदा किरकोळ अपघात होत असतात. दुचाकीच्या चाकात स्टोल, स्कार्फ अडकून अनेक महिला, युवती पडल्या आहेत. शुक्रवारी सातारा येथे महिलेचे प्राणही गेले. त्यामुळे महिला, युवतींनी स्कार्फ कितीही फॅशनेबल असला तरी जपूनच वापरला पाहिजे. 

Web Title: fashionable stoles use alert