नवीन रस्त्यांसाठी आणि स्वच्छतेसाठी मंगळवेढ्यात उपोषण

हुकूम मुलाणी
बुधवार, 11 एप्रिल 2018

मंगळवेढा - स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत नागरिकांची स्वच्छता समिती स्थापन करून शनिवार पेठातील सर्व गटारे व शौचालय स्वच्छ करून दरवाजे दुरुस्त करण्यात यावे. तसेच, शनिवार पेठ, मेटकर गल्लीतील रस्ता नवीन करण्यात यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते आदित्य हिंदुस्तानी यांनी ११ एप्रिल रोजी शिवाजी तालीम कट्टा येथे लाक्षणिक उपोषण सुरू केले.     

याबाबत त्यांनी म्हटले आहे की, सर्वेक्षण 2018 अंतर्गत स्वच्छ सुंदर मंगळवेढा करण्यासाठी नगरपालिकेच्या शहरात पाच हजार डस्टबीनचे वाटप करण्यात आले. यामुळे शासनाच्या गुणांकनामध्ये नगरपालिका राज्यात पहिल्या दहा क्रमांकामध्ये आली आहे. शहरात स्वच्छतादूतांना 1600 टी शर्टचे वाटप करण्यात आले. मात्र ते स्वच्छतादूत काय काम करतात यावर संशोधन करण्याची गरज आहे. प्रभागातील प्रत्येक घरात ओला कचरा ठेवण्यासाठी हिरव्या रंगाचे डस्टबीन तर वाळलेल्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाच्या डस्टबीनचे वाटण्यात आले. याशिवाय घरात जमा होणारा कचरा इतरत्र न टाकता या या डस्टबीनमध्येच टाकावा असे आवाहन करण्यात आले. मात्र ओला व सुका कचरा वेगवेगळा करून त्याचे काय केले जाते त्याबाबत कोणतीही उपाय योजना करण्यात आले नसून, फक्त गाजावाजा करून शहर स्वच्छतेसाठी चौकाचौकात माहिती दर्शक फलक लावण्यात आले. त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. 

स्वच्छ सर्वेक्षण 2018 ची टीम पाहण्यासाठी येणार म्हणून दोन दिवसाची स्वच्छतेचे नाटक करण्यात आल्याचा आरोप हिंन्दुस्थानी यांनी केला. 

शनिवार पेठ परिसरातील शिवाजी तालीम परिसर, वडार गल्ली, मेटकर गल्ली, मारुती मंदिर परिसर, बेरड गल्ली, सनगर गल्ली यासर्व विभागात गटारे तुडूंब भरून वाहत आहेत शौचालयाची अवस्था तर दयनीय झाली आहे. धूर फवारणी नसल्याने दासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे मलेरिया सारखे जीवघेणे आजार नागरिकांना होऊ शकतात

''शहरातील स्वच्छतेचे काम सुरूच आहे. नागरिकाकडून पालिकेला सुचना मिळताच त्याची दखल घेतली जाते. रस्त्याच्या कामाची निविदा दोन दिवसात निघणार आहे''.
अरूणा माळी नगराध्यक्षा

Web Title: fasting for new road & cleanliness