विवाहीत मुलीसह आई-वडिलांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

कऱ्हाड : विवाहीत मुलीसह आई वडीलांनी आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. शिवाजी आनंदा मोहिते (वय 59), बेबी शिवाजी मोहिते (43) व वृषाली विकास भोईटे (23) असे संबधितांचे आत्महत्या केलेल्यांचे नाव आहे. दुपारी तीनच्या सुमारास विद्यानगर येथील गुरूदत्त काॅलनीत आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. मुलगी वृषाली हिने आधी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्या घटनेने हादरलेल्या तिच्या आईवडीलांनी तेथेच सिलींग फॅनला एकाच ओढणीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. 

घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीमुसार मोहिते यांचे उंब्रज मुळगाव आहे. मात्र श्री. मोहिते येथील एसटी आगारात नोकरीस होते. ते सध्या निवृत्त आहेत. त्यामुळे ते विद्यानगर भागातील गुरूकृपा काॅलनीत अनेक वर्षापासून राहत आहेत. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. मुलगा नोकरीनिमित्ताने पुणे येथे असतो. मुलगी वृषाली हिचा दोन महिन्यापूर्वी 9 फेब्रुवारी ला विवाह झाला आहे. तीची वाघोली - वाठार स्टेशन सासुरवाडी आहे. ती काही दिवसांपासून माहेरीच होती. आज दुपारी वृषालीने अचानक विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ती घरातील कोचवर निपचीप पडली होती. ती काहीच बोलत नाही. म्हणून तिच्या आई वडीलांनी तीला हलवून पाहिले. मात्र तीने काहीच प्रतिसाद दिला नाही. तिचा मृत्यू झाल्याची त्यांची खात्री झाली. त्यावेळी त्वरीत त्यांनी त्यांच्या पुणे येथील मुलास ती गोष्ट सांगितली. त्याचवेळी त्यांची रडारड सुरू होती. त्यांचा फोन कट करून मुलाने त्याच्या विद्यानगर येथील मित्रांना घरी जावून पाहण्यास ते मित्र घरी पोचेपर्यंत त्याच्या आईवडीलांनी सिलींग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याचे कारण अद्यापही समजू शकले नाही.

Web Title: Father and Mother committed suicide with married daughter