Ishwarpur Crime : कौटुंबिक वाद तसेच आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणातून बाप-लेकाने मिळून केला सख्ख्या भावाचा खून

कौटुंबिक वाद तसेच आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणातून बाप-लेकाने मिळून सख्ख्या भावाचा विळ्याने सपासप वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली.
Crime

Crime

sakal

Updated on: 

ईश्वरपूर/जुनेखेड (जिल्हा सांगली) - कौटुंबिक वाद तसेच आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणातून वाळवा तालुक्यातील जुनेखेड (जिल्हा सांगली) येथे बाप-लेकाने मिळून कपिल झाजम्या पवार (वय-३५) या सख्ख्या भावाचा विळ्याने सपासप वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. आज रात्री साडेआठच्या सुमारास राहत्या घरीच हा प्रकार घडला. या घटनेत कपिल जागीच ठार झाला. याप्रकरणी वडील झाजम्या कस्तान्या पवार (वय-६५) व भाऊ अजय झाजम्या पवार (वय-४५) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com