'या कारणामुळे' धारदार शस्त्राने बापानेच केला मुलाचा खून...

Father kills yammana with sharp weapon in manjari karnatka marathi news
Father kills yammana with sharp weapon in manjari karnatka marathi news

मांजरी (निपाणी) : शेतातील पीक नुकसानीची रक्कम शासनाकडून आली असता ती रक्कम घर व इतर कामासाठी का देत नाही. तसेच त्याच रक्कमेतून दररोज मद्यप्राशन करून कुटुंबातील सदस्यांना का त्रास देता, असा जाब जन्मदात्या, मद्यप्राशन करणाऱया व्यसनी बापाला मुलाने विचारला. त्यामुळे व्यसनी बापाने चिडून मुलाचा धारधार शस्त्राने निर्घृन खून केला. केरूर (ता. चिक्कोडी) येथे ही घटना आज (ता. 15) घडली. यमनाप्पा सिद्धाप्पा निडगुंदी (वय 39) असे मृत मुलाचे तर सिद्धाप्पा यमनाप्पा निडगुंदी (वय 65) असे आरोपी पित्याचे नाव आहे. अंकली पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

 या बाबत पोलिस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी, यमनाप्पा सिद्धाप्पा निडगुंदी व सिद्धाप्पा यमनाप्पा निडगुंदी या पिता-पुत्रांना व्यसन होते. त्या दोघांमध्ये दररोज वाद-विवाद होत. शुक्रवारी (ता. 14) रात्री दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते. त्या रागाच्या भरात पित्याने जन्म दिलेल्या मुलाला घरासमोरच रात्री झोपलेल्या अवस्थेतच धारदार शस्त्राने तोंड व मानेवर वार करून निर्घून खून केला. त्यानंतर स्वतः आरोपी पोलिस स्थानकात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक चाैकशी चालविली आहे.

या घटनेची माहिती मिळतात चिक्कोडीचे मंडल पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील व अंकली पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक एम. एम. तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन रितसर घटनेची नोंद केली. मयत यमनाप्पा याची पत्नी रेखा हिने पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. अंकली पोलिस अधिक तपास करत आहेत. चिक्कोडी येथील सरकारी रूग्णालयात शवचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर सायंकाळी केरूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत यमनाप्पा याच्या मागे वडील, आई, पत्नी असा परिवार आहे.

हेही वाचा- मुंडेचा आदेश आणि त्या वादग्रस्त गृहपालाची अखेर बदली....
याच खूनाची परिसरात चर्चा
बापाने मुलाचा खून केल्याची माहिती काही वेळातच सोशल मीडियावरून सर्वत्र व्हायरल झाली. बाप व्यसनासाठी कोणत्या थराला जावू शकतो, हे या घटनेने दाखवून दिल्याचे ठिकठिकाणी बोलले जात होते. त्यामुळे परिसरात याच खूनाची चर्चा रंगली होती.  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com