म्‍हणून अल्‍पवयीन प्रियकर, मुलीने केला बापाचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

सकाळी मुलगी शेजाऱ्यांकडे गेली. "वडील उठत नाहीत, त्यांना काय झाले आहे, हे पहा' असे ती त्यांना म्हणाली. त्यानंतर शेजारी त्यांच्या घरी आले. त्यांनी वडिलांना हवलवून उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते उठले नाहीत. त्यांना त्यांच्या गळ्यावर व्रण दिसले. त्यामुळे शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती तालुका पोलिसांना दिली.

सातारा : प्रियकराच्या मदतीने सातारा तालुक्‍यातील एका गावामधील मुलीने अपंग वडीलांचा गळा आवळून खून केला. हे दोघेही अल्पवयीन आहेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

हे वाचा - सासरा माझ्याकडे एकटक पाहातो...

याबात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खून झालेल्या अपंग वडिलांना एक मुलगा व मुलगी आहे. त्यांची पत्नी गेल्या 15 वर्षांपासून बेपत्ता आहे. अद्याप तिचा शोध लागलेला नाही. त्यांचा मुलगा हा काल (ता. 22) बाहेरगावी गेला होता. आज सकाळी मुलगी शेजाऱ्यांकडे गेली. "वडील उठत नाहीत, त्यांना काय झाले आहे, हे पहा' असे ती त्यांना म्हणाली. त्यानंतर शेजारी त्यांच्या घरी आले. त्यांनी वडिलांना हवलवून उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते उठले नाहीत. त्यांना त्यांच्या गळ्यावर व्रण दिसले. त्यामुळे शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती तालुका पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. या वेळी त्यांना संबंधीत व्यक्तीचा खून झाल्याचा संशय आला. पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर सहायक पोलिस अधिक्षक समीर शेख व पोलिस निरीक्षक सजन हंकारे यांनी घटनास्थळी भेट दिली. 

आणखी वाचा - नवरीला पहिल्या रात्रीच दाखवला पॉर्न व्हिडिओ...

वरिष्ठांनी श्‍वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांचे पथक बोलावले. घटनस्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शविवच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर खून झालेल्या वडिलांच्या अल्पवयीन मुलीकडे घटनेबाबत चौकशी करण्यात आली. चौकशीत तिची उत्तरे संशयास्पद वाटली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आणखी कसून चौकशीला सुरवात केली. त्यामध्ये तीने प्रियकाराच्या मदतीने वडीलांचा खून केल्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या अल्पवयीन प्रियकरालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले.

हेही वाचा - प्रियकराला शेवटचे मिठीत घेतले अन्...

या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. त्यांना लग्न करायचे होते. परंतु, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वडीलांनी दोघांना विरोध केला होता. त्यातूनच दोघांनी त्यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. दोन्ही अल्पवयीन मुलांकडे चौकशी सुरू आहे. या गुन्ह्याची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस निरीक्षक सजन हंकारे तपास करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father Murder By Minor Girl Satara