पोलिसांसमोर पीडित मुलीने अत्याचाराचा पाढाच वाचला. अक्षरशः नराधमाचे कृत्य ऐकून डोळ्यांमध्ये अश्रू व बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
उमदी : जत पूर्व भागातील एका गावात अत्यंत घृणास्पद आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. तेरा वर्षांच्या लेकीवर बापानेच अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. संशयितावर बालिकेचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत (POCSO Act) रात्री उशिरा उमदी पोलिसांत (Umadi Police) गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयित नराधमास गजाआड केले.