पिता-पुत्राची हत्या; दहा जणांना जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

नगर - जमिनीच्या वादातून काटेवाडी (ता. जामखेड) येथे तीन वर्षांपूर्वी पिता-पुत्राची हत्या झाली. त्या गुन्ह्यात न्यायालयाने आज पाच आरोपींना हयात असेपर्यंत जन्मठेप, तर पाच आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी 15 हजार रुपये दंड केला. 

नगर - जमिनीच्या वादातून काटेवाडी (ता. जामखेड) येथे तीन वर्षांपूर्वी पिता-पुत्राची हत्या झाली. त्या गुन्ह्यात न्यायालयाने आज पाच आरोपींना हयात असेपर्यंत जन्मठेप, तर पाच आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी 15 हजार रुपये दंड केला. 

महादेव गहिनीनाथ बहीर, सुखदेव रघुनाथ बहीर, शहाजी रघुनाथ बहीर, मल्हारी कैलास बहीर, दादा किसन बहीर, राजेंद्र महादेव बहीर, रघुनाथ साहेबराव बहीर, कैलास तात्याबा बहीर, सोमनाथ उद्धव बहीर, संदीप गणपत बहीर (सर्व रा. काटेवाडी, ता. जामखेड), अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. आसाराम बहीर, नितीन आसाराम बहीर, अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. काटेवाडी (ता. जामखेड) येथील मृत आसाराम यशवंत बहीर यांचा भावकीतील महादेव गहिनीनाथ बहीर यांच्याशी शेतजमिनीच्या ताब्याबाबत वाद होता. याबाबत दाखल दाव्याचा निकाल आसाराम बहीर यांच्या बाजूने लागला. त्यामुळे आरोपींनी चिडून आसाराम बहीर यांना धमक्‍या देणे, मारहाण करणे, असा त्रास सुरू केला. याबाबत त्यांनी पोलिस ठाण्याला कळविले. तसा गुन्हा दाखल झाला. आसाराम बहीर 12 मे 2015 रोजी पहाटे घरामध्ये झोपलेले होते. त्या वेळी आरोपी महादेव बहीर व इतर 32 जणांनी त्यांच्या घरात घुसून गज, लाकडी दांडके, काठ्यांनी जबर मारहाण केली. मुलगा नितीनलाही जबर मारहाण केली. त्याची आई सोडविण्यासाठी गेली असता तिलाही मारहाण केली. पिता-पुत्र बेशुद्ध पडले होते. 

Web Title: Father-son murder case in nagar

टॅग्स