मलकापुरात बिबट्याची दहशत

leopard
leopard

मलकापूर : बिबट्याच्या हल्यात आज पाळीव कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. टाकेवस्ती चचेगांव (ता. कराड) येथील दुर्वास भोसले यांच्या घरामागील शेडात आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कुत्र्याच्या आवाजामुळे घरातील सदस्य जागे झाल्याने बिबट्याने धूम ठोकली. दरम्यान पंधरा दिवसात दोन वेळा पाळीव प्राण्यांवर हल्ला झाल्यामुळे चचेगांव परिसरात घबराट निर्माण झाली आहे. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आगाशिव डोंगराच्या पश्चिमेकडील बाजूस कोयना नदीकाठी चचेगांव जुने गावडठाण परिसर आहे. आगाशिव डोंगराकडेला दुर्वास भोसले यांचे घर आहे. मागील बाजूला पत्र्याचे शेड आहे. भोसले कुटुंबीययांना वेगवेगळ्या जातीचे श्वान पाळण्याचा छंद आहे. ती पाळीव श्वान घरापाठीमागील शेडमधील पंधरा दिवसांपूर्वीच अल्सेशियन जातीचा कुत्रा बिबट्याने पळवला होता.

मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शेडमधल कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याच्या गळ्याला जखम झाल्यामुळे तो गंभीर जखमी झाले आहे. कुत्र्याने केलेल्या गोधळामुळे घरातील सदस्य जागे झाले. माणसाचा सुगावा लागताच बिबट्याने आगाशिव डोंगराच्या दिसेने धूम ठोकली. याबाबत माहिती पवार यांनी वनविभागाला दिली. वनविभागाचे वनपाल रमेश जाधवर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी आढळलेले ठसे व कुत्र्यावरील झालेल्या हल्ल्याची पद्धत पाहता हा हल्ला बिबट्यानेच केला असल्याचा अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com