

Crores in Business Affected as Sangli Jaggery Market Remains Shut Amid Quality Checks
sakal
-विष्णू मोहिते
सांगली : अन्न, औषध विभागाकडून गुळात साखर, गंधक व रासायनिक रंगाच्या वापराबद्दल सुरू झालेल्या कारवाईमुळे दहा-बारा दिवसांपासून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाचे लिलाव पूर्णतः ठप्प झाले आहेत. रोज कोट्यवधींची उलाढाल असणाऱ्या बाजारात शांतता पसरली आहे. व्यापारी, हमाल, तोलाईदार, वाहनचालक आणि शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे आहे. दर्जेदार गुळासाठी सांगली बाजाराची देशभर ओळख आहे. तरीही गूळ बाजारपेठेने अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईचा धसका घेतला आहे.