निर्भया पथकाचा कोल्हापुरातील टवाळखोरांना हिसका

निर्भया पथकाचा कोल्हापुरातील टवाळखोरांना हिसका

कोल्हापूर - निर्भया पथकाने धडक कारवाई करत आज टवाळखोरांना हिसका दाखवला. महावीर, कॉमर्स कॉलेजसह केएमटी, एस.टी.बसमध्ये तरुणींना छेडणाऱ्या टवाळखोरांना पकडून त्यांचे पालकांसमोर समुपदेशन केले. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या रोमिओंवर कारवाई केली. 

महाविद्यालय सुरू झाल्याने टवाळखोरांचे घोळके महाविद्यालय परिसरात वाढू लागले आहेत. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी आज निर्भया पथकाने पोलिस उपनिरीक्षक अनिता मेणकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाईस सुरवात केली. कॉमर्स व महावीर महाविद्यालय परिसरातील टोळक्‍यांवर कारवाई केली. त्यातील काही टवाळखोरांना पकडून त्यांच्या पालकांना बोलावून घेऊन त्यांच्यासमोर त्यांची कानउघाडणी केली. पथकाने सुरू केलेल्या कारवाईमुळे परिसरातील टोळक्‍यांनी काढता पाय घेतला. 

त्याचबरोबर या परिसरात वाहतूक नियमांचा भंग करून घिरट्या घालणाऱ्या रोमिओंवरही या पथकाने दंडात्मक कारवाई केली. तसेच केएमटी व एसटी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन होणारी छेडछाड रोखण्यासाठी साध्या वेशात पथकाने गस्त घातली. याठिकाणी शेरेबाजी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक भाषेत समजही दिला. या पथकात पोलिस कर्मचारी किशोर पाटील, सविता पाटील, कोमल पाटील, अविनाश तारळेकर, सूरज भोपळे यांचा समावेश होता.  

निर्भया पथकाची कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे. महाविद्यालये, शाळा परिसरात टवाळखोरांकडून छेडछाडीचा प्रकार होत असेल तर याबाबत निर्भयपणे तक्रार देण्यासाठी पुढे या.
- अनिता मेणकर, 

पोलिस उपनिरीक्षक, निर्भया पथकप्रमुख.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com