सोलापूरकरांसाठी महापालिकेचे फिलगुड अंदाजपत्र; 18 कोटी रुपयांची सुचवली वाढ

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 12 जून 2018

सोलापूर :  कोणत्याही प्रकारचे कर व दरवाढीची शिफारस नसलेले 1357 कोटी 49 लाख 67 हजार 401 रुपयांचे अंदाजपत्रक सभागृहनेते संजय कोळी यांनी आज सादर केले. स्थायी समिती सभापती निवड न्याय प्रविष्ठ असल्याने संजय कोळी यांनी अंदाजपत्रक सादर केले. गतवर्षी 1239 कोटी रुपयांचे अंदाज पत्रक सादर केले होते. त्यात यंदा अंदाजे 118 कोटींची वाढ सुचवली आहे.

सोलापूर :  कोणत्याही प्रकारचे कर व दरवाढीची शिफारस नसलेले 1357 कोटी 49 लाख 67 हजार 401 रुपयांचे अंदाजपत्रक सभागृहनेते संजय कोळी यांनी आज सादर केले. स्थायी समिती सभापती निवड न्याय प्रविष्ठ असल्याने संजय कोळी यांनी अंदाजपत्रक सादर केले. गतवर्षी 1239 कोटी रुपयांचे अंदाज पत्रक सादर केले होते. त्यात यंदा अंदाजे 118 कोटींची वाढ सुचवली आहे.

महसूली विभागातून 588 कोटी 91 लाख 79 हजार, पाणीपुरवठ्यापासून 88 कोटी 71 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. महसूल निधीतून भांडवली कामासाठी 211 कोटी 14 लाख 31 हजार रुपये अपेक्षित धरण्यात आले आहेत. अनुदानातून 434 कोटी 70 लाख, कर्ज विभागातून 10 कोटी, विशेष अनुदान सहा कोटी, शासकीय सहाय18 कोटी रुपये असे एकूण 1357 कोटी 49 लाख 67 हजार 401 रुपये अपेक्षित धरण्यात आले आहेत.

खर्च विभागात कर्मचाऱ्यांच्या पगारावर 169 कोटी 49 लाख 9 हजार रुपये, कर्जावरील खर्च 3 कोटी 32 लाख 96 हजार, प्राथमिक शिक्षण 16 कोटी 13 लाख 85 हजार, पाणीपुरवठा 88 कोटी 71 लाख, सेवानिवृत्ती वेतन व तोषदान 55 कोटी 46 लाख, आरोग्य 18 कोटी 46 लाख, निगा व दुरुस्ती 33 कोटी 80 लाख, दिवाबत्ती व अग्निशमन 14 कोटी 38 लाख, विकास शुल्क 25 कोटी, गुंठेवारी क्षेत्रात मुलभूत सुविधा 10 कोटी, आवश्यक बाबींवर नैमित्तीक खर्च 74 कोटी 70 लाख, संकीर्ण 1 कोटी 80 लाख, महसूल निधीतून भांडवली कामासाठी वर्ग 155 कोटी 34 लाख 3 हजार आणि परिवहन उपक्रमाला सहाय्य 11 कोटी इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

महत्त्वाच्या शिफारसी
- शहरात दिवसाआड, हद्दवाढ भागात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा.
- आरक्षणांचा विकास करण्यासाठी नियोजन करावे.
- नवीन उद्योगांना करामध्ये पाच वर्षांसाठी प्रती वर्ष 20 टक्के सवलत द्यावी.
- झोपडपट्टीतील पक्क्या घरांसाठी कर आकारण्यासाठी समिती
- हद्दवाढ भागात भाजी मंडई सुरु करावी.
- जुळे सोलापुरात नाट्यगृह उभारावे.
- सार्वजनिक नळ बंद करून, प्रत्येक झोपडीधारकास मोफत नळजोड द्यावा.
- शहरातील उद्यानांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरु कराव्यात.
- महावितरणला एलबीटी लागू करावी.
 

Web Title: feelgood budget of municipal corporation for Solapur; suggested 18 crores rupees increased