महिला ड्रायव्हर घरातूनच फिरवताहेत एसटीचे स्टेअरिंग...

दौलत झावरे
सोमवार, 13 एप्रिल 2020

प्रशिक्षणाचा कालावधी आणखी एक महिना वाढणार की आहे तोच राहणार आहे, याची चिंता प्रशिक्षणार्थी महिलांना लागली आहे. या संदर्भात प्रत्येक प्रशिक्षणार्थी एकमेकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

नगर ः राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसचे चालक व वाहक या पदासाठी 163 महिलांची निवड केली. या महिला चालक व वाहकांना प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली आहे. मात्र, कोरोनामुळे या सर्वांचे प्रशिक्षण थांबविले आहे. प्रशिक्षणार्थींना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी वाढण्याची शक्‍यता आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. हे लॉकडाउन होण्याच्या अगोदर राज्याने संचारबंदी लागू केली होती. या संचारबंदीचा आदेश लागू होताच एसटीच्या प्रशिक्षणार्थी चालकांचे प्रशिक्षण थांबवून त्यांना सुटी देण्यात आली होती. 

हेही वाचा - सुटलो बुवा... माणिकदौंडीचे बारा रिपोर्ट निगेटीव्ह

या प्रशिक्षणामध्ये नगर जिल्ह्यातील तीन महिलांचा समावेश आहे. त्यांचे प्रशिक्षण औरंगाबाद येथे सुरू आहे. औरंगाबाद येथील प्रशिक्षणात 32 प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. यामध्ये नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव, परभणी, जालना येथील महिलांचा समावेश आहे. 
 
प्रशिक्षणार्थी चिंतेत 
प्रशिक्षणाचा कालावधी आणखी एक महिना वाढणार की आहे तोच राहणार आहे, याची चिंता प्रशिक्षणार्थी महिलांना लागली आहे. या संदर्भात प्रत्येक प्रशिक्षणार्थी एकमेकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

काही घरीच धडे गिरवतात 
प्रशिक्षणार्थी चालक महिलांमधील काही महिला प्रशिक्षणादरम्यान दिलेल्या सूचना व माहितीच्या आधारे घरात त्याचे पाठ गिरवत आहेत. वाहतुकीच्या नियमांचे व सोशल मीडियावरून वाहन चालविण्याचा अभ्यास करीत आहेत. कोरोनामुळे एक महिन्याच्या सुट्या देण्यात आल्या आहेत. या विषाणूचा फैलाव अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळे 12 महिन्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी 14 महिन्यांचा होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Female driver drives home steering ST ...