"पीव्हीपीआयटी' च्या विद्यार्थिनींनी बनवले भुईमूगासह-खत पेरणी मशिन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

सांगली- बुधगाव (ता. मिरज) येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ईटीसी विभागातील चतुर्थ वर्षातील तेजस्विनी मुळीक, ऐश्‍वर्या कवठेकर, अश्‍विनी मोटकट्टे यांनी भुईमूगाचे बियाणे खतासह पेरणी करणारे यंत्र बनवले आहे. आतापर्यंत भुईमूग पेरणी व काढणीचे मशिन उपलब्ध होते. परंतू या विद्यार्थिनींनी बियाणे आणि खते मिसळून पेरणी करणारे मशिन बनवले आहे. तसेच ते मोबाईल ऍपवरून नियंत्रित करता येते. 

तेजस्विनी मुळीक, ऐश्‍वर्या कवठेकर, अश्‍विनी मोटकट्टे यांनी प्रोफेसर शिरीष फाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर मेहनत घेऊन हे मशिन बनवले आहे. मशिन डिझाईन कंट्रोलर्स ऑफ डिझाईन पेटंट इंडियाकडे सादर केले आहे. त्यांनी ते स्विकारले आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स ऍन्ड टेलिकम्युनिकेशन विभागातील या विद्यार्थिनींनी भुईमूग लागवड यंत्रामध्ये नविन संशोधन केले आहे. आतापर्यंत मशिनद्वारे भुईमूग पेरणी आणि काढणी करता येत होती. परंतू या मशिनमध्ये बियाणे आणि खते एकत्रितपणे मिसळले जाते.

ठराविक अंतरावर आणि आवश्‍यक तितक्‍या खोलवर बियाणे खतासह पेरणी केल्यामुळे उगवण क्षमता चांगली वाढते. तसेच भुईमूग मशिनमधून ते काढता येते. मोबाईल ऍपवरून मशिन नियंत्रित करत येते. बॅटरी चार्जिंगनंतर दोन ते तीन गुंठे पेरणी आणि काढणी करता येते. विद्यार्थिनींचे हे संशोधन शेतकऱ्यांच्या उपयोगी ठरेल. संस्थेचे अध्यक्ष विशाल पाटील, विश्‍वस्त अमित पाटील यांचे सहकार्य लाभले. तसेच संस्थेचे संशोधन व विकास सेलचे प्रमुख डॉ. ढवळे, इनोव्हेशन सेलचे समन्वयक प्रा. हरूगडे, संस्थेचे बी.एस. पाटील, मेकॅनिकल प्रा. अमर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विभागप्रमुख प्रा. ए.जी. पाटील, प्राचार्य डॉ. घेवडे, कुलसचिव श्री. पाटील, प्रा.कुंभोजकर आदींचे प्रोत्साहन मिळाले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fertilizer sowing machine with groundnut made by the students of "PVPIT"