'वसंतदादा' प्रशासनाविरूद्ध एकत्रीत लढण्यावर बैठक निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

सांगली - वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कामगार, निवृत्त कामगार, ऊस पुरवठादार शेतकरी, सभासदांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत विविध मागण्यांसाठी यापुढे एकत्रतपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आला.

सांगली - वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कामगार, निवृत्त कामगार, ऊस पुरवठादार शेतकरी, सभासदांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत विविध मागण्यांसाठी यापुढे एकत्रतपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आला.

कारखान्यावर प्रशासन नेमावा यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता. 8) आठ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामकाजादिवशी "उपोषण' करण्यात येणार आहे. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय कोले याच्या उपस्थितीत बैठक झाली. वसंत सुतार, सुनिल फराटे, रावसो दळवी, सुरेश सादरे, एकनाथ कापसे, बाबुराव माळी, बाळासो पाटील, नामदेव जगताप आदी उपस्थित होते. साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची उसबिले, ठेवी अशी सुमारे 90 कोटी व कामगारांचे सन 2005 ते 10 काळातील 36 महिन्यांचा पगार, सन 2016 मधील दहा महिन्यांचा पगार, 2013-14 मधील ओव्हरटाईम, बोनस, जुलै 2015 पासूनची पगारवाढीच्या रक्कमा आजपर्यंत मिळाल्या नाहीत. 2002 पासून 2016 पर्यंत 1600 कामगार निवृत्त झाले. त्यांची ग्रॅच्युईटी, फंडाच्या रक्कमा मिळाल्या नाहीत. कारखान्याने 2008 पासून ही देणीही अहवालात दाखवली नाहीत. कारखान्याला लेखापरिक्षण खाते व साखर आयुक्तालयही सहकार्य करीत आहे, अशी टीकाही करण्यात आली.

Web Title: Fight with unity against Vasantdada