रस्ते अडवले तर गुन्हे दाखल करू

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

सांगली - मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी (ता. 31) राज्यात चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. या वेळी कायदा व सुव्यवस्थेला धक्का बसल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. चक्का जाम आंदोलन रोखण्यास पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. कोपर्डीतील घटनेप्रकरणी अजून आरोपींना शिक्षा झालेली नाही. आरक्षण प्रश्‍नावरही सरकार गप्प आहे. त्यामुळे सरकारला इशारा देण्यासाठी समाजातर्फे राज्यात चक्का जाम आंदोलनाचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर श्री. शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ""चक्का जाम आंदोलनाविषयी मराठा क्रांती मोर्चा आयोजकांकडून पोलिस यंत्रणेला आजपर्यंत कोणतीही माहिती मिळालेली नाही; पण जिल्ह्यात जमावबंदी व आचारसंहिता लागू असल्याने पोलिसांची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चक्का जाम करण्यात येणाऱ्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येईल. त्यातून कायदा व सुव्यवस्थेला कोठेही धक्का लागणार नाही. सनदशीर मार्गाने व कायदेभंग न करता मागण्या मांडणे व मान्य करून घेणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे; परंतु कायदा हातात घेऊन केले जाणारे आंदोलन बेकायदा आहे. रस्ता अडवणे कायदेभंग आहे. तसे आढळल्यास गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील.'' 

ते म्हणाले, ""चक्का जाम आंदोलनावेळी रस्ता बंद केल्याने सामान्य नागरिकांना त्रास होतो. जनजीवन विस्कळित होते. याची जबाबदारी सर्वस्वी आंदोलकांची आहे. सहभागी युवकांनीही याचा गांभीर्याने विचार करावा. गुन्हे दाखल झाल्यानंतर शासकीय अथवा खासगी नोकरी मिळण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे बेकायदा कृत्यापासून दूर राहावे.'' 
.. 

Web Title: To file criminal charges if the roads were blocked