पैठण : आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल

filed fir against one in case of violation of the code of conduct
filed fir against one in case of violation of the code of conduct

पैठण : लोकसभा निवडणूक आचार संहिता लागू असतांना येथील नगर पालिकेच्या सरकारी जागेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांच्या वाढदिवसाचा फलक लावल्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी एका संशयित विरुध्द पैठण पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. 18) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याच्या या पहिल्या गुन्ह्याची नोंद येथे झाली आहे. 

पोलिसांनी सांगितले की, शहरातील संभाजी चौक ते संत ज्ञानेश्वर उद्यान मार्गावरील  नगर पालिकेच्या रस्त्यावरील विद्युत पोलवर खासदार रावसाहेब दानवे यांच्या वाढदिवसाचा शुभेच्छा दर्शविणारा डिजिटल बोर्ड कार्यकर्त्यांनी लावला होता. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव यांना माहिती मिळताच उद्यान रोड येथे पाहणी करण्यासाठी पालिकेचे एक पथक तेथे पाठविण्यात आले असता 11 डिजिटल बोर्ड लावण्यात आल्याचे पथकाला दिसून आले. पथकातील अश्विनी गोजरे, अशोक पगारे व पाटीलबा घुले यांनी हे बोर्ड काढुन जप्त केले. यानंतर या घटनेची माहिती पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी संशयित योगेश टेकाळे याच्या विरुध्द प्रिव्हीशन डिफेन्समेट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 चे कलम (3) चे उल्लंघन केले म्हणून गुन्हा नौंदविला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.

आचार संहितेचा भंग करणाऱ्या विरुध्द कडक कारवाई : तहसीलदार महेश सावंत 
दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता पैठण विधानसभा मतदार संघात लागू करण्यात आली आहे. याबाबत सर्व राजकीय व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सुचना देण्यात आली असून आदर्श आचार संहितेच्या काळात भंग करणाऱ्या विरुध्द कडक कारवाई केली जाईल. असा इशारा तहसीलदार तथा सहायक निवडणुक अधिकारी महेश सावंत यांनी दिला आहे. आचार संहिता भंग झाल्याचा हा जिल्ह्यात पहिला गुन्हा असल्याचे श्री. सावंत यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com