वर्षा उसगावकर म्हणाल्या.. कलाकारांची फसवणूक टाळण्यासाठी महामंडळ सज्ज!

परशुराम कोकणे
शनिवार, 11 जानेवारी 2020

सोलापूर : चित्रपटात संधी देतो म्हणून कलाकारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ प्रयत्नशील आहे. फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी चित्रपट महामंडळाचे भरारी पथक कार्यरत आहे. कोणत्याही प्रकारची फसवणूक होत असेल तर तत्काळ चित्रपट महामंडळाकडे तक्रार करायला हवी, असे आवाहन महामंडळाच्या संचालिका अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी शनिवारी केले. 

सोलापूर : चित्रपटात संधी देतो म्हणून कलाकारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ प्रयत्नशील आहे. फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी चित्रपट महामंडळाचे भरारी पथक कार्यरत आहे. कोणत्याही प्रकारची फसवणूक होत असेल तर तत्काळ चित्रपट महामंडळाकडे तक्रार करायला हवी, असे आवाहन महामंडळाच्या संचालिका अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी शनिवारी केले. 

हेही वाचा -  अश्‍लील इमोजीमुळे अडकला फेसबुक फ्रेंड!

पूर्वीच्या तुलनेत सोलापूर बदलत आहे
सोलापुरात आयोजित केलेल्या वर्षारंग कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेत्री वर्षा उसगावकर सोलापुरात आल्या होत्या. त्यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात उपस्थित राहून पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी सोलापूरचे गायक मोहम्मद आयाज उपस्थित होते. मी आजवर अनेकदा सोलापूरला आले आहे. राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या कुटुंबासोबत आमचे चांगले नातेसंबंध आहेत. पूर्वीच्या तुलनेत सोलापूर बदलत आहे, असे अभिनेत्री वर्षा उसगावकर या वेळी म्हणाल्या. 

हेही वाचा - माहिती आहे का? 'मिडल ईस्ट'ला जाताहेत सोलापूरचे मासे!

प्रत्येक अभिनेत्याची खासियत वेगळी
चित्रपट आणि लघुपटासाठी ऑडिशन घेणाऱ्या संस्थांनी, व्यक्तींनी मराठी चित्रपट महामंडळाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे असे सांगून अभिनेत्री वर्षा उसगावकर म्हणाल्या, हिंदी चित्रपटांसोबतच आता मराठी चित्रपटांना चांगली प्रसिद्धी मिळत आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, अशोक सराफ या प्रत्येक अभिनेत्याची खासियत वेगळी होती. त्यांच्यासोबत काम केल्याचा आनंद वेगळा आहे. "मी टू'च्या चर्चेनंतर चित्रपट क्षेत्रात बदल झाले आहेत. महिलांकडून आपली तक्रार होईल याची भीती या क्षेत्रात निर्माण झाली आहे. अण्णागिरी हा चित्रपट तयार झाला असून तो प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. चांगल्या भूमिका आल्या तरच मी स्वीकारते, असेही अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी सांगितले. 

वर्षा उसगावकर यांना पद्मभूषण पुरस्कार मिळावा
दरम्यान, मराठी चित्रपटांसोबत बॉलिवूडमध्ये विविध चित्रपट कलाकारांसोबत काम करणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पद्मभूषण पुरस्कार मिळावा, अशी मागणी सोलापूरचे गायक मोहम्मद आयाज यांनी या वेळी केली आहे. महाराष्ट्र

ऑडिशनच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबायला हवी. कोणत्याही प्रकारची फसवणूक होत असेल तर तत्काळ चित्रपट महामंडळाकडे तक्रार करायला हवी. कलाकारांनीही या संदर्भातील माहिती विचारली पाहिजे. या संदर्भातील मुद्दा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या बैठकीत मी मांडणार आहे. 
- वर्षा उसगावकर, 
अभिनेत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: film actres varsha usgaonkar news