प्राथमिक शिक्षकाने सख्या भावावर झाडली गोळी

राजेंद्र सावंत
सोमवार, 14 मे 2018

घरगुती वादातून निवडुंगे (ता. पाथर्डी) येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास प्राथामिक शिक्षकाने माजी सैनिक असलेल्या सख्या भावावर पिस्तूने गोळीबार केला. त्याच वेळी आडव्या आलेल्या कुत्र्याच्या पाठीला गोळी चाटून गेल्याने भाऊ वाचला. त्यामुळे "जीवावर बेतले, ते कुत्र्यावर निभावले' अशीच काहीशी स्थिती झाली होती. 

पाथर्डी - घरगुती वादातून निवडुंगे (ता. पाथर्डी) येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास प्राथामिक शिक्षकाने माजी सैनिक असलेल्या सख्या भावावर पिस्तूने गोळीबार केला. त्याच वेळी आडव्या आलेल्या कुत्र्याच्या पाठीला गोळी चाटून गेल्याने भाऊ वाचला. त्यामुळे "जीवावर बेतले, ते कुत्र्यावर निभावले' अशीच काहीशी स्थिती झाली होती. 

सामोपचाराने हे प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, अखेर माजी सैनिक बाळासाहेब कोंडीराम मरकड यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात आज फिर्याद दिली. त्यानुसार शिक्षक उद्धव कोंडीराम मरकड, पुष्पा पानसरे व नीलेश पानसरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. "बहिणीस माहेरी मुक्कामी का राहू दिले' असे विचारून शिक्षक उद्धव यांनी गोळीबार केल्याचे बाळासाहेब यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, गोळीबारासाठी वापरलेला पिस्तूल उद्धव यांचा दुसरा भाऊ रमेश यांचे जावई नीलेश पानसरे यांचा आहे. त्यांनी तो पत्नीकडे ठेवला होता. उद्धव यांनी पानसरे यांच्या पत्नीकडून पिस्तूल मागवून हा गोळीबार केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तेथून रिकामे काडतूस ताब्यात घेतले.

Web Title: fire on brother in nivdunge