esakal | दुर्दैव! सलग दुसऱ्या वर्षी जनावरांवर काळाचा घाला, रेठरे धरण येथील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्दैव! सलग दुसऱ्या वर्षी जनावरांवर काळाचा घाला, रेठरे धरण येथील घटना

दुर्दैव! सलग दुसऱ्या वर्षी जनावरांवर काळाचा घाला, रेठरे धरण येथील घटना

sakal_logo
By
विजय लोहार

नेर्ले (सांगली) : रेठरे धरण (ता. वाळवा) येथील गावाच्या दक्षिणेला असलेल्या माळावरील शेतकरी रामचंद्र सर्जेराव समिंद्रे व कृष्णात सर्जेराव समिंद्रे यांच्या छप्पर व गवताच्या गंजीस दुपारी अचानक लागली. या आगीत पाच जनावरे गंभीर भाजली असून यामध्ये नऊ महिने गाभण असलेल्या गाईसह, म्हैस आणि रेडीचा होरपळून मृत्यू झाला. आगीत सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

रेठरे धरण येथील रामचंद्र आणि कृष्णात समिंद्रे यांचे डोंगर पायथ्याला शेतजमीन व जनावरांची वस्ती आहे. दुपारी साडे बाराच्या सुमारास कामे उरकून ते दोघे घरी आले. त्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास समिंद्रे यांच्या छप्पर व गवताच्या गंजीस आग लागल्याचे समजले. हे अंतर गावापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर आहे. तातडीने कुटुंबातील सदस्यांसह व काही युवकांनी तिथे धाव घेतली. तोपर्यंत वस्तीवरील छप्पर व दोन गवताच्या गंज्या जळून खाक झाल्या होत्या. तर एका गाभण गाईचा दुर्दैवाने होरपळून मृत्यू झाला होता.

तरुणांचे प्रयत्न व्यर्थ

येथील अमर तरुण गणेश मंडळातील युवक व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परिसरात कोणीही नसल्याने छपरात अडकलेल्या एक गाय, म्हैस, दोन रेड्या आणि एक बैल आगीत गंभीरपणे भाजले. रामचंद्र समिंद्रे यांच्या मालकीची नऊ महिने गाभण असलेली एक गाय या आगीत मृत्युमुखी पडली. एकूण तीन लाखाचे नुकसान झाले.

मागील वर्षी दोन बैल आगीच्या भक्षस्थानी

मागील वर्षी रेठरे धरण येथील समिंद्रे यांचे दोन बैलजोड छप्परात असताना आधीच दुपारी आग लागली होती. त्यात त्यांचे दोन्ही बैलांचा होरपळून मृत्यू झाला होता.