कोहकडी येथे लागलेल्या आगीत दोन झापड्या जळून खाक

मार्तंड बुचुडे
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पारनेर - येथील कोहकडी येथे काल (बुधवार) सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दोन झोपड्या जळून खाक झाल्या. यामध्ये या झापडी धारकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांचा संसारच उघड्यावर आला आहे.  

मोलमजुरी करून उदर्निवाह करणारे सुदाम बर्डे यांची झोपडी व शेजारी रहाणाऱ्या दोन मुलाच्या झोपड्या जाळाल्या. त्यात त्यांचे कपडे, भांडी, धान्य, यासह रेशनकार्ड मतदान ओळख पत्र आदींसह रोख 10 हजार आदी जळून गेल्याने बर्डे यांचे जणू नशीबच जळून गेले आहे.

घटनेची माहिती मिळताच, कामगार तलाठी दादासाहेब करपे, ग्रामसेवक संजय गवळी यांनी भेट देऊन पंचनामा केला. तशेच माजी सभापती सुदाम पवार यांनी बर्डे यांचे सांत्वन करून सरकारी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे अस्वासन दिले
या वेळी बाळासाहेब गायकवाड, विलास आदोडे, गोपीनाथ रासकर, राजेंद्र गोगडे आदींनी भेट दिली.

दगम्यान, ही आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Web Title: fire in kohkadi parner